नवी दिल्ली : कोरोना झाल्यामुळे यूपीएससीच्या 2021-22 मधील मुख्य परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने या प्रकरणी निर्णय देताना विद्यार्थ्यांना मोठा दिलासा (Relief) दिला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या याचिकेवर फेरविचार करून दोन आठवड्यांत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने यूपीएससीला दिले आहेत. कोरोना संसर्गामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्या, त्याबाबत दोन आठवड्यांत पुनर्विचार करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Supreme Court reassures students about giving another chance for UPSC main exam)