मुंबई : 2015 च्या यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) टॉप केल्यानंतर सतत चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीना डाबी या दलित आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना यूपीएससीचा पहिला दलित टॉपर असं संबोधलं जातं. टीना डाबी यांनी अनेकदा सार्वजनिक मंचावरुन मागसलेल्यांच्या उन्नतीसाठी भाष्य केलं आहे. टीना डाबी यांनी यांनी एका मुस्लिम समाजातील अधिकाऱ्यासोबत लग्न केलं होतं. यावेळी त्यांनी जातीचेच नाही तर धर्माचेही बंधन तोडलं होतं. त्यावेळी आंतरधर्मीय विवाह केल्याबद्दल अनेकांनी टीना डाबी यांचं कौतुक केलं होतं. टीना डाबी यांचं पहिलं लग्न काही कारणास्तव टिकलं नाही. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्या विवाह बंधनात अडकणार आहेत. टीना या महाराष्ट्रातील लातूरच्या सुनबाई होणार असून, त्यांचं लग्न प्रदीप गावंडे (Dr. Pradeep Gawande) यांच्याशी होणार आहे. आपल्या होणाऱ्या पतीची जात हा एक बोनसपाईंट असल्याचं टीना एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
2015 च्या UPSC निकालानंतरच सोशल मीडियावर चर्चा होती की टीना डाबी यांनी जातीचा फायदा घेत परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तेव्हा लोक आरक्षणावरुन प्रश्न उपस्थित करत होते आणि टीना यांच्यावर टीकाही झाली. वास्तविक पाहता त्यावेळी टीना डाबी आरक्षणाच्या कट ऑफ अंतर्गत यूपीएससीची प्रिलिम्स पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झाल्या होत्या. SC/ST प्रवर्गातील कमी कट ऑफ गुणांमुळे त्या मुख्य परीक्षा देऊ शकल्या. तर सर्वसाधारण गटातील अनेक उमेदवार त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवणूणही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकले नव्हते.
दरम्यान, फायनल रिझल्ट वेळी त्या ओव्हर ऑल टॉपर राहिल्या. त्यात प्रिलिमचे मार्क जोडले गेले नव्हते. तरीही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. कारण टीना हा एसटी कॅटेगरी असूनही त्या आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिवारातून आहेत.
त्यानंतर टीना या अनेक व्यासपीठावरुन दलित समाजाबाबत बोलताना पाहायला मिळाल्या. मुंबईच्या बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने टीना यांना सन्मानितही केलं होतं. त्यावेळी त्यांनी आज मी जे काही आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे असल्याचं म्हटलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
टीना डाबी दुसऱ्यांदा लग्न करत असून ती महाराष्ट्रातील लातूरची सुन होणार आहे. आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी टीना डाबी लग्न करणार आहे. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रदीप गावंडे यांचा हा टीना प्रमाणेच दुसरा विवाह असेल. त्यांनी चुरु जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. प्रदीप यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप आणि टीना यांचा विवाह सोहळा 22 एप्रिलला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये होणार आहे.
View this post on Instagram
इतर बातम्या :