AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hariyana Suicide : हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

सुशील आणि त्याची पत्नी शीला हे दोघे काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघेही शीलाच्या आईच्या घरी राहत होते. पत्नी आणि सासू दररोज सुशीलकडे पैशांची मागणी करायच्या. पैसे दिले नाही तर दोघीही त्याला वारंवार धमकावत असत, अशी माहिती सुशीलचा भाऊ समशेरने दिली.

Hariyana Suicide : हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 31, 2022 | 6:23 PM
Share

भिवानी : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पती (Husband)ने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना हरियाणातील भिवानी येथे घडली आहे. सुशील (44) आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशीलने सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली होती. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पत्नी आणि सासूच्या दररोजच्या मागण्या आणि धमक्यांना कंटाळून सुशीलने आपल्या मूळ गावी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. (In Haryana, man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law)

पत्नी आणि सासू दररोज पैशाची मागणी करायच्या

सुशील आणि त्याची पत्नी शीला हे दोघे काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघेही शीलाच्या आईच्या घरी राहत होते. पत्नी आणि सासू दररोज सुशीलकडे पैशांची मागणी करायच्या. पैसे दिले नाही तर दोघीही त्याला वारंवार धमकावत असत, अशी माहिती सुशीलचा भाऊ समशेरने दिली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आणि सुसाईड नोट ताब्यात घेतले. सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस तपासानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.

भंडाऱ्यात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पिपरी चुन्नी येथील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामदयाल पटले (45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास लावला. सकाळी शेजारचा शेतकरी शेतावर गेले असताना त्याला रामदयाल यांचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती देत सिहोरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविला. तर रामदयाल यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. (In Haryana, man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law)

इतर बातम्या

VIDEO : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत झाली कैद

Video Gadchiroli accident | गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...