AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?

CJP Protest Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दिल्ली पोलिसांसह केंद्र सरकारवर मोठा आरोप केला. कालच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यांनी आज सरकारवर मोठा गंभीर आरोप केला.

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?
अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?
| Updated on: Jul 21, 2026 | 10:34 AM
Share

Abhijeet Dipke big Allegation on Modi Government: काल काँक्रोच जनता पार्टीने संसदेकडे मार्चचे नियोजन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारने अत्यंत क्रूरपणे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 12-14 वर्षांच्या मुलींवर लाठीहल्ला केला. अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. आज सकाळी त्यांनी जंतर मंतरवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर गंभीर आरोप केले. हे सरकार आपल्याच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत असल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. तर यावेळी सरकारच्या हेतूवरही दिपके यांनी संशय व्यक्त केला.

शंभरहून अधिक आंदोलक जखमी

लहान मुलं आहेत. शाळा कॉलेजातील मुलं आहेत. १७-१८ वर्षाची आहेत. एक महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय. काही झालं नाही. काल दिल्ली पोलिसांमुळे हल्ला झाला. त्यांनी लाठी हल्ला केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. एका मुलीला जबर मारलं. या मुलीला काही झालं तर त्याला मोदी आणि प्रधान जबाबदार असेल. १५० मुलं जखमी झाले आहेत. मी रुग्णालयात जाऊन पाहिलं. मोदींच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी हल्ला केला, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.

वांगचुक यांचे उपोषण सुरूच राहणार

दगडांचे ट्रक कुठून आले. आमच्या प्रत्येकाच्या बॅगा चेक केल्या जात आहे. बॅरिकेड्स लावले आहेत. पक्षीही आत शिरू शकत नाही. मग ट्रक कुठून आले. पोलिसांनी प्लान केला आहे. काल सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आले. त्यांच्या हातात पोलिसांनी दांडके दिले. नेम प्लेट हटवून मारहाण केली. काल वांगचुक उपोषण सोडणार होते. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं होतं. त्यांची देशाला गरज आहे हे सांगितलं. त्यांनी ऐकलं. पण काल मुलांना ज्या पद्धतीने मारहाण झाली. त्यामुळे वागंचुक यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी केली आहे.

वांगचुक यांच्याशी माझी चर्चा झाली. डॉक्टर आणि वांगचुक यांच्या पत्नीशीही बोललो. वांगचुक यांचं शरीर केवळ २०-२५ दिवसच उपोषण सुरू करू शकतं. तीन चार दिवसाने त्यांचे अवयव डॅमेज होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यांना परत उपोषण सुरू करावं लागलं हे दुर्देव आहे. पोलिसांनी ज्या क्रूरपणे मारहाण केली हे पाहून त्यांनी उपोषण सुरू केलं, असे दिपके म्हणाले.

काय होता सरकारचा प्लॅन?

आमचं धरणं आंदोलन सुरू राहील. आमच्या सोबत सरकारने टाइम वेस्ट केला. मागण्यांच्या चर्चेसाठी बोलावलं. बोलावून मोबाईल जप्त केले.मला एकटं पाडलं गेलं. त्यामुळे गोंधळ उडेल हा त्यांचा प्लान होता. आमचे सदस्य एकत्र राहू नये हा त्यांचा डाव होता, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. पाच तास नड्डा यांच्या घरी बसवून ठेवलं. नेम टॅग हटवून मुलांवर हल्ला केला. आता आम्ही चर्चेला जाणार नाही. त्यांना आमच्याकडे चर्चेला यावं लागेल, असे दिपके यांनी जाहीर केले आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात