AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिले; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप

abhijeet dipke news : अभिजीत दीपके यांनी सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. दीपके यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिले; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप
| Updated on: Jul 21, 2026 | 11:36 AM
Share

नवी दिल्लीत क्रॉकोच जनता पार्टीचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी संसद मार्चमधील आंदोलकांनी जंतर-मंतरवर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक संसदेच्या दारात पोहोचून आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जदरम्यान अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. दीपके यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अभिजीत दीपके म्हणाले, क्रूरपणे दिल्ली पोलिसांनी मुलांना मारलं, १२-१२ वर्षाच्या मुलींचं डोकं फोडलं. पुरुष पोलिसांनी मुलींचा गळा पकडून त्यांचं डोकं फोडलं. मी स्वत: पाहिलं. माझ्या बाजूलाही मुलगी आहे. पोलिसाने तिचे कपडे फाडले. तिच्या छातीवर पाय दिले,. पोलिसांना मुलांचा खून करण्याचे ऑर्डर होते का. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी मुलांचं रक्त सांडवायचं होतं का. मुलांचं डोकं फोडू नये म्हणून आम्ही मागे हटलो. सरकारला मुलांची पर्वा नाही. मुलांवर ज्या पद्धतीने मारलं जात होतं. त्यावरून दिल्ली पोलिसांना काय ऑर्डर होतं हे समजून येतं’.

दीपके पुढे म्हणाले, लहान मुलं आहेत. शाळा कॉलेजातील मुलं आहेत. १७-१८ वर्षाची आहेत. एक महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय. काही झालं नाही. काल दिल्ली पोलिसांमुळे हल्ला झाला. त्यांनी लाठी हल्ला केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. एका मुलीला जबर मारलं. या मुलीला काही झालं तर त्याला मोदी आणि प्रधान जबाबदार असेल. १५० मुलं जखमी झाले आहेत. मी रुग्णालयात जाऊन पाहिलं. मोदींच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी हल्ला केला. दगडांचे ट्रक कुठून आले. आमच्या प्रत्येकाच्या बॅगा चेक केल्या जात आहे. बॅरिकेड्स लावले आहेत. पक्षीही आत शिरू शकत नाही. मग ट्रक कुठून आले. पोलिसांनी प्लान केला आहे. काल सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आले. त्यांच्या हातात पोलिसांनी दांडके दिले. नेम प्लेट हटवून मारहाण केली. काल वांगचुक उपोषण सोडणार होते. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं होतं. त्यांची देशाला गरज आहे हे सांगितलं. त्यांनी ऐकलं. पण काल मुलांना ज्या पद्धतीने मारहाण झाली. त्यामुळे वागंचुक यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला’.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!