AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत झाली कैद

अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा भागात 29 मार्च रोजी ही हाणामारीची घटना घडली. याठिकाणी राम पवार यांची अंडापावची गाडी आणि छोटं कँटीन आहे. या कॅन्टीनमध्ये फिर्यादी गुरुनाथ सावंत आणि रवी शिंदे हे दोघे 29 मार्च रोजी रात्री 8 च्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेले होते.

VIDEO : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत झाली कैद
अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारीImage Credit source: टीव्ही9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 31, 2022 | 4:58 PM
Share

अंबरनाथ : किरकोळ कारणावरून अंडापावच्या गादीवर फ्रीस्टाईल हाणामारी (Freestyle Fighting) झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. राम पवार, दादासाहेब पवार, गुरुनाथ सावंत, रवी शिंदे अशी हाणामारी करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात आयपीसी 324, 504 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Freestyle fight over Andapav’s stall due to a minor dispute in Ambernath)

किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी

अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा भागात 29 मार्च रोजी ही हाणामारीची घटना घडली. याठिकाणी राम पवार यांची अंडापावची गाडी आणि छोटं कँटीन आहे. या कॅन्टीनमध्ये फिर्यादी गुरुनाथ सावंत आणि रवी शिंदे हे दोघे 29 मार्च रोजी रात्री 8 च्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेले होते. तिथे गुरुनाथ यांचा मामा शिवाजी देशमुख काम करतो. त्यामुळे गुरुनाथ याने मालक वेळेवर पगार देतो का? अशी विचारणा त्याच्या मामाला केली. त्याचा अंडापाव गाडीचालक राम पवार आणि त्याचा मुलगा दादासाहेब पवार यांना राग आल्यानं या दोघांनी गुरुनाथ आणि रवी शिंदे या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळं या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचा हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आयपीसी 324, 504 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Freestyle fight over Andapav’s stall due to a minor dispute in Ambernath)

इतर बातम्या

Video Gadchiroli accident | गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

Ambernath Accident : अंबरनाथमध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...