सोलापुरात दरोड्यासह सहा घरफोड्या करणारा दरोडेखोर अटकेत; ग्रामीण गुन्हे शाखेकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात दरोड्यासह सहा घरफोड्या करणारा दरोडेखोर अटकेत; ग्रामीण गुन्हे शाखेकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त
सोलापुरात दरोड्यासह सहा घरफोड्या करणारा दरोडेखोर अटकेत

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्यासह त्यांच्या पतीला मारहाण करून 3 लाख 16 हजाराचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असता गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून सनीदेवल सुरेश काळे (25) या आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सागर सुरवसे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 31, 2022 | 4:02 PM

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यासह हन्नुर, चपळगाव, पानमंगरुळ, तडवळ तसेच मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडी (Burglary) आशा सात गुन्ह्यांची उकल करून 18 लाख 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखे (Crime Branch)ने ही कारवाई केली आहे. अन्य पाच आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. (Burglar arrested in Solapur 18 lakh seized from Rural Crime Branch)

पाच फरार आरोपींचा शोध सुरु

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्यासह त्यांच्या पतीला मारहाण करून 3 लाख 16 हजाराचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असता गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून सनीदेवल सुरेश काळे (25) या आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील तालुक्यातील 6 गुन्हे आणि मोहोळ तालुक्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघड करण्यात आलेत. यामध्ये एकूण 39 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 80 ग्राम चांदीचे दागिने असा एकूण 18 लाख 76 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील अन्य पाच आरोपींचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना पकडण्यात लवकरच यश येईल अशी माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी दिली.

औरंगाबादमधील वाळूज परिसरात कश्यप गँगचा धुमाकूळ

औरंगाबादमधील वाळूज परिसरात दुर्लभ कश्यप गॅंगचा धुमाकूळ घातला आहे. भर रस्त्यात चार ते पाच जणांना एकाला बेदम मारहाण केली आहे. भर रस्त्यात ही मारहाण केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. दुर्लभ कश्यप गॅंगचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दुर्लभ कश्यप गॅंगच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Burglar arrested in Solapur 18 lakh seized from Rural Crime Branch)

इतर बातम्या

Nagpur Crime | 60 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार; दुसरीकडं शिक्षिकेची विद्यार्थिनीला मारहाण

Mahant Rape MP : आधी IPS, नेते हात जोडून उभे असायचे आता त्यांनीच ‘भगवा’ उतरवला, रेपचा आरोपी सीताराम दास अखेर अटकेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें