ICAI CA Exam:आयसीएआयच्या मे सत्रातील सीए परीक्षांसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

| Updated on: May 04, 2021 | 12:00 PM

सीएच्या विविध मे महिन्यातील विविध परीक्षासांठी नोंदणी करण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. CA Exam Application Window Reopens

ICAI CA Exam:आयसीएआयच्या मे सत्रातील सीए परीक्षांसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स
ICAI CA
Follow us on

ICAI CA Exam Application Window Reopens:नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीएच्या विविध मे महिन्यातील विविध परीक्षासांठी नोंदणी करण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. मे महिन्यातील परीक्षांसाठी नोंदणी करण्यासाठ अंतिम तारीख 6 मे आहे. विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. मात्र, विलंब शुल्क 600 रुपये भरावं लागेल. ( ICAI CA Exam Application Window Reopens till 6 May for various Chartered Accountants examinations May 2021)

कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना अर्ज करता येणार?

आयसीएआयनं दिलेल्या माहितीनुसार चार्टर्ड अकाऊँटंटस फायनल, इंटमिजीएट, इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल एक्झामिनेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत 4 मे सकाळी पासून ते 6 मे 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.

ICAI CA मे सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी कशी करायची?

स्टेप 1: ICAI CA च्या मे मधील सत्राच्या परीक्षेला अर्ज करायचा असल्यास प्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2:तिथे परीक्षार्थी नोंदणीवर क्लिक करा.
स्टेप 3:विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूकपणे सादर करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
स्टेप 4: परीक्षा फी जमा करावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावा.
स्टेप 5:अर्ज डाऊनलोडकरुन त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवावी.
स्टेप 6:परीक्षेची फी भरण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर करावा.

सीएच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी आयसीएआयची स्थापना

आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आणि विलंब शुल्क 600 रुपये भरावे लागतील. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आणि विलंब शुल्क 10 अमेरिकन डॉलर आहे.

संबंधित बातम्या:

ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

ICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

( ICAI CA Exam Application Window Reopens till 6 May for various Chartered Accountants examinations May 2021)