AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी ब्रेकअपबद्दल अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली “मी आता शिकले..”

अभिनेत्री तारा सुतारिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अभिनेता वीर पहारियासोबतचं तिचं नातं अवघे काही महिनेच टिकलं होतं. यानंतर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी ब्रेकअपबद्दल अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली मी आता शिकले..
वीर पहारिया आणि तारा सुतारियाImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2026 | 9:11 AM
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहारिया हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने अभिनेत्री तारा सुतारियासोबतचं रिलेशनशिप जगजाहीर केलं होतं. एकत्र ट्रिप आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईतील एका कॉन्सर्टमध्ये गायक ए. पी. ढिल्लोंला सर्वांसमोर ताराने मिठी मारली आणि किस केलं, तेव्हा या दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं गेलं. या कॉन्सर्टनंतर लगेचच काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. नंतर जेव्हा वीर पहारियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतसुद्धा तारा दिसली नव्हती, तेव्हा मात्र ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तारा पहिल्यांदाच याविषयी व्यक्त झाली.

‘एले इंडिया’शी बोलताना तारा म्हणाली, “मी नेहमीपासून हेच मानत आली आहे की यश हे आपल्या आतून येतं.. मनाची शांती, काही लोक जे तुमच्यावर प्रेम करतात, स्वत:ला ओळखणं, हेच माझं नेहमीपासूनचं लक्ष्य राहीलं आहे. मी माझ्या शांतीचं रक्षण करायचा शिकली आहे. आपल्या नर्वस सिस्टिमला शांत कसं करायचं, हे फक्त आपल्यालाच माहित असतं.” ताराची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टनंतरच तारा आणि वीर यांच्या नात्यात दुरावा आल्याचं पहायला मिळालं. स्टेजवर एपी ढिल्लों आणि तारा सुतारिया एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. परंतु हे सर्व मला आणि माझ्या नात्याला उद्ध्वस्त करण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप नंतर ताराने केला. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्यात आल्याचंही तिने म्हटलं होतं. त्याच्या काही दिवसांनीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.

‘फिल्मफेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार, तारा आणि वीरने सहमताने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. परंतु एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओनंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याने, नेटकऱ्यांनी त्याच्याशी संबंध जोडला आहे. वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी