IIT Bombay चा मोठा निर्णय! MMS कांड नंतर अनेक बदल

| Updated on: Sep 22, 2022 | 6:21 PM

यानंतर आयआयटी मुंबईनं आपल्या सुरक्षा प्रक्रियेत अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटीचे अधिकारी करू इच्छित असलेल्या सुरक्षा बदलांविषयीचे ईमेल मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

IIT Bombay चा मोठा निर्णय! MMS कांड नंतर अनेक बदल
IIT-Bombay
Image Credit source: tv9
Follow us on

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) मधील एका कँटीन कर्मचाऱ्याला मुलींच्या वसतिगृहातील बाथरूमचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण एमएमएस कांडची माहिती फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. यानंतर आयआयटी मुंबईनं आपल्या सुरक्षा प्रक्रियेत अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटीचे अधिकारी करू इच्छित असलेल्या सुरक्षा बदलांविषयीचे ईमेल मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

तपासानंतर वसतिगृहातील प्रवेशापासून सर्व संभाव्य मुद्दे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढले आहेत. कॅम्पस मेस आणि हॉस्टेलमधील पुरुष कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करण्यात येणार असून, केवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत रात्रीचे कँटीन बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

“कँटीन पुन्हा एकदा सुरू होईल कारण त्यात केवळ महिला कर्मचारी आहेत,” असे संस्थेच्या प्रवक्त्याने यापूर्वी सांगितले होते. तर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. इतर मुलींच्या वसतिगृहांचेही सुरक्षा ऑडिट करण्यात येणार आहे.”

आयआयटी मुंबई महिला वसतिगृहाच्या बाथरुमबाहेरील खिडकीवर रविवारी एका महिला विद्यार्थिनीला मोबाइल फोन दिसला आणि तिने तातडीने अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर पवई पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं.

त्याचवेळी पोलिसांनी किमान पाच कॅन्टीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि त्यानंतर प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी एका २२ वर्षीय कॅन्टीन कामगाराला मुख्य संशयित म्हणून ओळखले आणि त्यानंतर त्याला अटक केली.

या घटनेनंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सतर्कतेने रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाइट कँटीनच्या कर्मचाऱ्याने हे उल्लंघन केलं. दरम्यान आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.