कोल्हापूरच्या डीकेटीई टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांनी करुन दाखवलं, जर्मनीच्या हॉफ युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड

| Updated on: Sep 13, 2021 | 7:18 AM

आदित्य स्वप्नील आवाडे, केशव ओमप्रकाश पारीख व यश महाबिरप्रसाद झंवर या विद्यार्थ्यांना हॉफ युनिव्हर्सिटी, जर्मनी येथे उच्च शिक्षण संपादन करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.

कोल्हापूरच्या डीकेटीई टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांनी करुन दाखवलं, जर्मनीच्या हॉफ युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड
उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड झालेले विद्यार्थी
Follow us on

कोल्हापूर: इचलकरंजी शहरातील डीकेटीईमधून डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरींग हा पदविका कोर्स पूर्ण केलेल्या आदित्य स्वप्नील आवाडे, केशव ओमप्रकाश पारीख व यश महाबिरप्रसाद झंवर या विद्यार्थ्यांना हॉफ युनिव्हर्सिटी, जर्मनी येथे उच्च शिक्षण संपादन करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हे विद्यार्थी टेक्स्टाईल इंजिनिअरींगचे पदवी शिक्षण घेण्यासाठी जर्मनीस रवाना होत आहेत. याआधीही डीकेटीईच्या टेक्स्टाईल पदवी विद्यार्थ्यांनी सेमिस्टर एक्स्चेंज अंतर्गत जर्मनी येथे शिक्षण संपादन केले आहे.

हॉफ युनिव्हर्सिटीने डीकेटीई मधील टेक्स्टाईल पदविकाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला रितसर मान्यता देत या विद्यार्थ्यांना जर्मनी येथे ‘इनोव्हेटीव्ह टेक्स्टाईल’ या पदवीच्या थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अ‍ॅडव्हान्सड रिसर्च लॅबोरेटरीज, अ‍ॅडव्हान्सड टेक्स्टाईल प्रोडक्शन इत्यादीचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना टेक्नीकल टेक्स्टाईल परिक्षण करणा-या सर्व सामुग्री व त्यांच्या विविध पध्दती याचे देखील ज्ञान यामुळे अवगत होणार आहे. या शिक्षणादरम्यान विद्यार्थी जगभरातील विविध रिसर्च तज्ञांशी विचार विनिमय करणार आहेत त्यामुळे त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळणार आहे. डीकेटीईच्या टेक्स्टाईल अभ्यासक्रमातील या लवचिकतेमुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.

25 हून अधिक विद्यापीठांशी सामंजस्य करार

डीकेटीई इन्स्टिटयूटचा परदेशातील 25 हून अधिक विद्यापीठांशी सामंजस्य करार आहे. या विद्यापीठांमध्ये शिक्षण आणि संशोधन याबाबत आदान प्रदान करण्यात आले आहे. हॉफ युनिव्हर्सिटी, जर्मनी यांचेबरोबर झालेल्या करारांतर्गत वरील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाशआण्णा आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, मानद सचिव डॉ.सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा.एस.ए. शेट्टी यांचे मार्गदर्शन मिळाले.

नीट परीक्षा संपन्न

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी ‘नीट यूजी’ परीक्षा घेण्यात आली.परभणी जिल्ह्यातील निवडक केंद्रांवर दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात ही परीक्षा घेण्यात आली.पुर्णा शहरातील श्री गुरुबुध्दी महाविद्यालय हे नीट परिक्षेचे केंद्र असताना संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर परभणीचा उल्लेख असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात पडले.काही विद्यार्थ्यांची नेमके परीक्षा केंद्र कोणते? हे शोधण्यात वेळ गेला तर अनेक पालकांची गैंरसोय झाली होती.

बीडमध्ये 24 केंद्रावर परीक्षा

बीड मध्ये देखील एकूण 24 सेंटरवर या परीक्षा होती, निवडल्या गेलेल्या संस्थांनी याची तयारी पूर्ण केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आलाय होता. सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या सावटात विद्यार्थी परीक्षा दिल्या. दरम्यान याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत या परीक्षा संपन्न झाली.

202 शहरात परीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा रविवारी पार पडली. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं. परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतं. परिक्षेचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं गेलं. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

Kolhapur DKTE three students selected for Higher Education in Germany Hof University