AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra FYJC CET 2021 : अकरावीच्या सीईटी परीक्षेबाबत नवा पेच, ICSE, IGCSE च्या विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

महाराष्ट्र सरकारनं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, आयसीएसई, आयजीसीएसई विद्यार्थ्यांकडून सीईटीच्या अभ्यासक्रमावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra FYJC CET 2021 : अकरावीच्या सीईटी परीक्षेबाबत नवा पेच, ICSE, IGCSE च्या विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
अकरावी प्रवेश सीईटी
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 11:32 AM
Share

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळं यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारनं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, आयसीएसई, आयजीसीएसई विद्यार्थ्यांकडून सीईटीच्या अभ्यासक्रमावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयसीएसई आणि आयजीसीएसईच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटी अभ्यासक्रमात समान अभ्यासक्रम असावा, अशी विनंती केली आहे. सीईटीच्या घोषणेनंतर राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आयसीएसई शाळांच्या असोसिएशनकडून अभ्यासक्रमाबाबत योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील आयसीएसई स्कूल असोसिएशन आणि आंतरराष्ट्रीय स्कूल असोसिएशनच्या सदस्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना विनंती केली आहे. सीईटीचा अभ्यासक्रम आयसीएसई आणि आयजीसीएसई विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे, असा दावा असोसिएशनच्या सदस्यांनी केला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.

सीईटीचा अभ्यासक्रम

यंदाचा सीईटी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यावर प्रश्न विचारेल जातील. सीईटीच्या निकालाच्या आधारे, विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात एफवायजेसी किंवा अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. असोसिएशननं दिलेल्या निवेदनात म्हटंलय की, आयसीएसई अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय वैकल्पिक आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आठवी पासून गणित आणि विज्ञान विषय घेत नाहीत त्यांनी त्याचे प्रश्न कसे सोडवावेत. आयसीएसई सामाजिक शास्त्रांचा अभ्यासक्रम राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सीईटीचा अभ्यासक्रम सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यासांठी सारखा असावा, असं त्यांनी म्हटलंय.

आयसीएसई असोसिएशनच्या नेमक्या मागण्या काय?

अकरावी प्रवेशासाठी सीईटी स्कोअरच्या बरोबरीने केंब्रिज इंटरनॅशनल आयजीसीएसई स्कोअरचा विचार करण्यात यावा. आयजीसीएसई परीक्षांचा प्रयत्न करणारे विद्यार्थी वाणिज्य, कला आणि विज्ञान विद्याशाखेचे असतात. बर्‍याच विद्यार्थ्यांनी 8 वी नंतरच विज्ञानाचा अभ्यास केलेल नसतो किंवा बरेच विद्यार्थी इतिहास किंवा भूगोल यासारख्या विषयांचा अभ्यास आठवीनंतर करत नाहीत त्यांनी कशी परीक्षा द्यावी.

राज्य मंडळांकडून प्रवेशासाठी सीइटीची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. बोर्डानं सीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत सीईटी परीक्षेची सविस्तर माहिती न पोहोचल्यानं परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन यावरुन विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.

सीईटीची प्रक्रिया कशी असेल?

सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.

इतर बातम्या:

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

सोलापूरमध्ये अकरावी प्रवेशासंदर्भात मोठा निर्णय, प्रवेश क्षमता 17 हजार जागांनी वाढवली

Maharahstra FYJC CET 2021 ICSE IGCSE students and school raise objections over FYJC CET syllabus wrote letter to Varsha Gaikwad

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.