सोलापूरमध्ये अकरावी प्रवेशासंदर्भात मोठा निर्णय, प्रवेश क्षमता 17 हजार जागांनी वाढवली

यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं अकरावी प्रवेशाचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजाराने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूरमध्ये अकरावी प्रवेशासंदर्भात मोठा निर्णय,  प्रवेश क्षमता 17 हजार जागांनी वाढवली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:55 AM

सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. दहावीच्या निकालानंतर बोर्डानं लगेचच अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीची  (FYJC CET)घोषणा केली आहे. अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याचं काम सुरु आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं अकरावी प्रवेशाचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजाराने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूरमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता 76 हजारांवर

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागानं अकरावी प्रवेशांचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्यात अकरावीची एकूण प्रवेश क्षमता 59 हजार  40 हजार एवढी होती. यंदा त्यात 17 हजाराने वाढ झाल्याने प्रवेश क्षमता आता 76 हजार 736 इतकी झाला आहे.

सीईटी द्यावी लागणार

राज्य सरकरानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी निश्चित केली आहे. ही परीक्षा वैकल्पिक आहे. दहावीमध्ये पास झालेल्या सर्व मुलांना प्रवेश मिळणार मात्र नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे.

राज्य मंडळांकडून प्रवेशासाठी सीइटीची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. बोर्डानं सीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत सीईटी परीक्षेची सविस्तर माहिती न पोहोचल्यानं परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन यावरुन विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.

सीईटीची प्रक्रिया कशी असेल?

सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.

इतर बातम्या:

अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरु; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

Solapur Education Department decided to increase seventeen thousand seats for class FYJC

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.