Maharashtra Board 12th Result 2026: यंदाचा निकाल पाहून अवाक व्हाल! पुन्हा मारली मुलींनी बाजी, फक्त एका क्लिकवर सगळी डिटेल्स

Maharashtra Board 12th Result 2026 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या निकालाची वैशिष्ट सांगितली आहेत. यंदा कोणी बाजी मारली जाणून घ्या...

Maharashtra Board 12th Result 2026: यंदाचा निकाल पाहून अवाक व्हाल! पुन्हा मारली मुलींनी बाजी, फक्त एका क्लिकवर सगळी डिटेल्स
HSC result 2026
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 11:44 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज, 2 मे 2026 रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. या निकालाची उत्सुकता राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल एकाच वेळी ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यापूर्वी महाराष्ट्र बोर्डाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. जाणून घ्या यंदा कोणी मारली बाजी…

किती टक्के लागला निकाल?

महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील विज्ञान, कला वाणिज्य आयटीआयसाठी १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास झालेले विद्यार्थी ८९.७९ टक्के आहे. खासगी विद्यार्थी १७ फॉर्म भरणारे ३६ हजार ९४१ प्रविष्ट झाले. उत्तीर्ण झालेले २९ हजार ६३४ आहेत. एकूण टक्केवारी ८०.२१ आहे. रिपीटर एकूण ५० हजार ३४६ विद्यार्थी १८ हजार ३४९ उत्तीर्ण झाले.

निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…

पुन्हा मुलींनी मारली बाजी

यंदा बारावीच्या निकालात मुलींनी पुन्हा बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३. १५ टक्के आहे. तर मुलांची टक्केवारी ८६.८० टक्के आहे. ६.३५ टक्के मुली मुलांपेक्षा उत्तीरअम झाल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थी ८ हजार ३६७ बसले होते. त्यापैकी ७ हजार ५७९ उत्तीर्ण झाले आहे. जवळपास ९०.५८ टक्के निकाल लागला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी निकालाचा टक्का घसरला

फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता

फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के

१५३ विषयांपैकी २६ विषयात १०० टक्के निकाल

१५३ विषयांपैकी २६ विषयात १०० टक्के निकाल लागला आहे.

निकाल कसा पाहायचा?

mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in यातील कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा.

‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) तिथे टाका.

तुमच्या आईचे पहिले नाव टाकावे लागेल.

त्यानंतर ‘View Result’ वर क्लिक करा.

निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्यायला विसरु नका.

Follow Us