
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बंद झालेल्या शाळा तब्बल आजपासून सुरू झाल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग कोरोना नियम पाळून सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली. शहरी भागातील आठवी ते बारावी तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत.

राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत संभ्रम

गेले अनेक दिवसापासून बंद असलेल्या शाळा आज पासून गजबजू लागल्या आहेत.

शिक्षकांचे लसीकरण, शाळा सॅनिटायझर आणि कोवीड नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

कित्येक दिवसानंतर शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधे उत्साह असून विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील २०९० शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. शहरीभागातील आठवी ते बारावी आणि ग्रामिण भागातील पाचवी ते बारावीपर्यतचे वर्ग आज सुरु झाले.

कोरोनाचे नियम पाळून या शाळा सुरु झाल्यात. या सर्व शाळांंमध्ये जवळपास पावणे दोन लाख मुलांनी हजेरी लावली.

फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे औक्षण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले होते.

संग्रहित छायाचित्र.

पिंपरी चिंचवड च्या म्हाळसकांत विद्यालयात ही मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

अंधेरीच्या एमव्हीएम इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं ढोलताशे वाजवून स्वागत करण्यात आलं. यावेळी शिक्षकांनी हवेत फुगे सोडून आनंद साजरा केला.