Maharashtra SSC Result 2021 Declared: दहावीचा निकाल पाहण्यासाठी सीट नंबर कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स

| Updated on: Jul 16, 2021 | 12:57 PM

Maharashtra SSC Result 2021 Declared: काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना सीट नंबर उपलब्ध न झाल्यास त्या विद्यार्थ्यांनी सीट नंबर कसा शोधावा यासाठी बोर्डाच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra SSC Result 2021 Declared: दहावीचा निकाल पाहण्यासाठी सीट नंबर  कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स
SSC Result
Follow us on

Maharashtra SSC Result 2021 Declared: मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. मात्र, परीक्षा रद्द झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आली नव्हती. शाळांमार्फत बैठक क्रमांक देण्यात आले होते. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना सीट नंबर उपलब्ध न झाल्यास त्या विद्यार्थ्यांनी सीट नंबर कसा शोधावा यासाठी बोर्डाच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

सीट नंबर कसा शोधायचा?

  1. http://result.mh-ssc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा
  2. यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
  3. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद कराॉ
  4. यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल

दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

एकूण आठ माध्यमानुसार सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इ.१०वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर झाले आहेत विद्यार्थ्यांना ते 1 वाजता उपलब्ध होतील.

निकाल कुठे पाहणार?
सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहाल ? (How to Check Maharashtra SSC Result 2021)
?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

दहावीच्या निकालाचं सूत्र काय?
दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल जाहीर, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!