ना सौंदर्य, ना लूक, ही अभिनेत्री तिच्या वेण्यांमुळे झाली प्रसिद्ध, दोन वेळा मोडले लग्न, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
50 पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या सौंदर्यामुळे नाही तर तिच्या वेण्यांमुळे मिळालेली प्रचंड ओळख. जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.

बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री. यामधील अनेक अभिनेत्री त्यांच्या स्वभाव आणि सौंदर्यामुळे किंवा त्यांच्या एखाद्या हटके लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. तामिळनाडू सरकारने अखेर 2016 ते 2022 या कालावधीतील राज्य चित्रपट पुरस्कार तसेच 2014 ते 2022 या कालावधीतील राज्य दूरदर्शन पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे. या पुरस्कार यादीत संवेदनशील अभिनय, दर्जेदार कथा आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांचा समावेश असून दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांना सन्मानित करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांचे नावही झळकले आहे.
राधिका सरथकुमार यांना 2014 च्या तामिळनाडू राज्य दूरदर्शन पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या सन्मानाबद्दलची आनंदाची बातमी त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. या पुरस्कारामुळे त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे.
हिंदीपासून साऊथपर्यंतचा प्रवास
तमिळ आणि तेलुगु भाषांमधील 50 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या राधिकाने 1986 साली ऋषी कपूर यांच्यासोबत हिंदी चित्रपट ‘नसीब अपना-अपना’मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटात फराह नाज मुख्य भूमिकेत असली तरी ‘चंदो’ या निरागस आणि भोळ्या पात्रामुळे राधिकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. आजही त्या चित्रपटसृष्टीत सक्रिय असून सोलो चित्रपट करत आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे.
सध्या राधिका सरथकुमार त्यांच्या आगामी तामिळ कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘थाई किझावी’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांचा लूक आणि भूमिका त्यांच्या आजवरच्या सर्व भूमिकांपेक्षा वेगळी आहे. विशेष म्हणजे, त्यांनी फार क्वचितच कॉमेडी भूमिका केल्या असून, त्यामुळेच या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. 64 व्या वर्षीही कोणत्याही मोठ्या अभिनेत्याविना सोलो चित्रपट करत असलेली राधिका ही प्रेरणादायी ठरत आहेत. हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सध्या केवळ त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
इतर वर्षांतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
2016 ते 2022 या कालावधीतील राज्य चित्रपट पुरस्कारांच्या यादीतही अनेक नामवंत अभिनेत्रींचा समावेश आहे. 2016 साली कीर्ती सुरेश यांना ‘पंबु सत्तई’साठी, 2017 मध्ये नयनतारा यांना ‘अरम्म’साठी, 2018 मध्ये ज्योतिका यांना ‘चेक्का चिवंता वानम’साठी, 2019 मध्ये मंजू वारियर यांना ‘असुरन’साठी, तर अपर्णा बालमुरली यांना ‘सोरारई पोटरू’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
