मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 27, 2021 | 5:29 PM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे.

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, या दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती आता ती 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.

यापूर्वी परीक्षा दोन वेळा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात परीक्षा लांबणीवर टाकली गेली होती.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.

6 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार

राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.

अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने पहिल्यांदाचा अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.सीईटी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास प्रिया शिंदे यांच्याशी 9689192899 तर संगीता शिंदे यांच्याशी 8888339530 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.

इतर बातम्या:

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, तारीखही ठरली

HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता? सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार

Maharashtra State Examination Council change exam date of 5th and 8th standard scholarship exam to 9 august know details