
MSBSHSE Maharashtra Board SSC 10th Results Check Link and Download The Marksheet in PDF Online : विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये इयत्ता 10 वी च वर्ष अत्यंत महत्त्वाच मानलं जातं. विद्यार्थी आणि पालक 10 वी च्या परीक्षेसाठी खास तयारी करतात. इयत्ता 10 च्या परीक्षेत मिळणारे गुण विद्यार्थी-विद्यार्थीनीच पुढचं आयुष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असं मानलं जातं. दहावीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर विद्यार्थी-विद्यार्थीनी विज्ञान, वाणिज्य, कला किंवा अन्य कुठल्या शाखांमध्ये, व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेश घ्यायचा ते ठरवतात. म्हणून दहावीची परीक्षा महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थी त्यासाठी दिवस-रात्र एक करतात. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालाची प्रतिक्षा आज संपणार आहे. 5 मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. आज 13 मे रोजी दहावी परीक्षाचा निकाल जाहीर होणार आहे. तुम्हाला ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वात आधी हा निकाल मिळू शकतो. मेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून निकाल तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही निकाल पाहू शकता. फक्त त्यासाठी ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.
इथे पहा दहावीचा निकाल. डाऊनलोड करा मार्कशीट.
10 वी च्या बरोबरीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड CBSE चा 10वीं रिझल्ट जाहीर झाला आहे. यंदा सीबीएसईचा रिझल्ट 93.66 % लागला आहे. सीबीएसईचे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट डिजीलॉकरवर रिझल्ट पाहू शकतात. तुम्ही SSC बोर्डाचा रिझल्ट इथे पाहू शकता.
TV9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही दहावीचा निकाल पाहू शकता. मार्कशीटही डाऊनलोड करु शकता.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर. इथे रिझल्ट पाहू शकता. मार्कशीट अशी करा डाऊनलोड.
दहावीच्या गुणपत्रिका 16 मे पासून शाळांमध्ये भेटण्यास सुरुवात होणार. दहावीच्या पुनर्परीक्षेची अवयवदन पत्र 15 मे पासून भरण्यास सुरुवात होईल.
टक्के निकाल जाणून घ्या
एकूण- ९ विभाग
कोकण- ९९.८२ (सर्वाधिक)
नागपूर- ९०.७८ टक्के (सर्वात कमी)
पुणे -९४.८१ टक्के
संभाजीनगर- ९२.८२ टक्के
मुंबई-९५.८४ टक्के
कोल्हापूर- ९६.७८ टक्के
अमरावती-९२.९५ टक्के
नाशिक- ९३.०४ टक्के
लातूर-९२.७७ टक्के
दहावीचा निकाल जाहीर व्हायला अर्धा तास शिल्लक आहे. तुम्ही तुमचा निकाल इथे पाहू शकता.
७ हजार ९२४ शाळांचा निकाल 100 टक्के. ३३. ७३ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के.
पुणे -१ हजार ३११
नागपूर ७३६
संभाजीनगर ६८७
मुंबई -१५७९
कोल्हापूर १११४
अमरावती ७८९
नाशिक ७७६
लातूर ४४६
कोकण ४८६
महाराष्ट्रात इयत्ता दहावीत शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळा 49 आहेत. कुठल्या विभागात किती शाळा आहेत ते जाणून घ्या.
पुणे – ७
नागपूर -८
संभाजीनगर -९
मुंबई -५
कोल्हापूर -१
अमरावती -४
नाशिक -४
लातूर १०
कोकण १
या शाळांचा निकाल शून्य टक्के लागला
जिल्हानिहाय सर्वाधिक निकाल
सिंधुदुर्ग ९९.३२ टक्के
जिल्हानिहाय सर्वात कमी निकाल
गडचिरोली ८३.६७ टक्के
कोणत्या केंद्रावर किती गैरप्रकार
पुणे – ७
नागपूर -७
संभाजीनगर – १३
मुंबई -३
कोल्हापूर -०
अमरावती -०
नाशिक -०
लातूर-७
कोकण -०
एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले. कुठल्या विभागात किती विद्यार्थी आहेत ते जाणून घ्या.
पुणे ५९
नागपूर ६३
संभाजी नगर २८
मुंबई ६७
कोल्हापूर १३
अमरावती २८
नाशिक ९
लातूर १८
कोकण ०
१०० टक्के मिळवलेले विद्यार्थी २११ आहेत. त्यात पुण्यात १३, नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, लातूर ११३, कोकण ९
उद्यापासून १४ मे पासून २८ मे पर्यंत गुण पडताळणी करता येईल. मंडळाकडे अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करता येईल. फि भरावी लागते. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे.
एक किंवा दोन विषयात नापास झाला तरी ११ वीत प्रवेश दिला जातो. एटीकेटी आहे. १२ वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण झाला आणि ११ वीची परीक्षा पास झाला तर तो १२ वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो. विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करण्याची सोय करून दिली आहे.
राज्यात २३ हजार ४८९ माध्यमिक शाळातून १५ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
मागच्यावर्षी दहावीचा निकाल किती टक्के?
मार्च २०२२- ९६.९४ टक्के
२०२३ – ९३.८३ टक्के
२०२४ – ९५.८१ टक्के
२०२५ – यंदाचा निकाल ९४.१० टक्के
गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्यांनी कमी झाली आहे.
४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहे. म्हणजे ६० किंवा त्याहून अधिक टक्केवारी असलेले. पण ७५ टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी. ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि ६० टक्के पेक्षा कमी मार्क घेतलेले विद्यार्थी. १ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी उत्तीर्ण आहे. ३५ टक्क्याहून अधिक ते ४५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत.
माध्यमिक शालांत परीक्षा ६२ विषयांसाठी घेतली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५ टक्के पेक्षा अधिक गुण पडलेले हे विद्यार्थी आहेत.
यंदा दहावीच्या परीक्षेत मुलीच हुशार ठरल्या आहेत. ९६.१४ टक्क्यासह मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे.
सर्व विभागात कोकण विभागाने बाजी मारली आहे. ९८.२८ टक्के निकाल. सर्वात कमी निकाल नागपूर ९०.७८ टक्के.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थी बसले. १४ लाख ८७ हजार ३९९ विद्यार्थी पास झाले. टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल ९३.०४ टक्के आहे.
९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थी नोंदणी. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी बसले. ८ हजार ८४८ पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के आहे.
१५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. ९४.१० टक्के विद्यार्थी पास झाले. २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थी बसले. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी पास झाले.
प्रत्येक पेपरसाठी नियमित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून दिली होती. परीक्षेत गैरप्रकार घडला तर कोणती शिक्षा होऊ शकते हे विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सांगितलं होतं. कोणती शिक्षा होऊ शकते याची कल्पना असावी म्हणून सांगण्यात आलं होतं.
ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला, त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. तपास करून हा निर्णय घेतला जाणार आहे. कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पोलिसांनी मदत केली.
इयत्ता दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत झाल्या. मार्च २०२५ चा निकाल. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख लेखी परीक्षेदरम्यान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. निकाल लवकर जाहीर होऊन ११ वीचे वर्ग सुरू व्हावे. तसेच पुरवणी परीक्षेचा निकालही लवकर लागावा यासाठी प्रयत्न होता असं शरद गोसावी यांनी सांगितलं.
एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना हा निकाल पाहता येईल.
तुम्हाला दहावीत किती टक्के मिळालेत? इथे पाहू शकता 10 वी चा रिझल्ट.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल tv9मराठीसह अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
तुम्हाला तुमचा दहावीचा निकाल tv9marathi.com वर पाहाता येऊ शकतो. दहावीचा निकाल पाहायचा कसा? काय आणि कशी प्रोसेस आहे? हे सोप्पं भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घ्या.
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा, रिझल्ट लागला की लगेच मेसेज किंवा ईमेलवर तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळणार
नोंदणीसाठी एक बॉक्स दिलाय. रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर या गोष्टी तुम्हाला नोंदणीसाठी लागतील.
इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. 119 केंद्रावर जिल्ह्यातील 25 हजार 857 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आज या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला होणार असून, या निकालाकडे विद्यार्थी,पालकांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील १५,४६३ विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे. परंतु, यशाने हुरळून अन् अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जिल्ह्यात एकूण ८८ केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेकरिता २८ भरारी पथके गठीत करण्यात आली होती. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. परीक्षेदरम्यान ११ संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकांची नेमणूक होती.
मागच्यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 टक्के लागला होता. नागपूर डिवीजनचा रिजल्ट सर्वात कमी 94.73 टक्के होता. एकूण 15,60,154 विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं. त्यापैकी 15,49,326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण14,84,431 विद्यार्थी यशस्वी झाले.
मागच्यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी च्या SSC परीक्षेत एकूण 95.81% टक्के विद्यार्थी यशस्वी झाले होते. 72 विषयांपैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला होता. एकूण 558021 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवले होते.
मागच्यावर्षी दहावीचा निकाल हा मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. राज्यभरातून 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
मागच्यावर्षी दहावीचा निकाल हा मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागला होता.
इयत्ता 10 वी च्या निकालाबाबत बोर्डाची पत्रकार परिषद 11 वाजता होईल. विद्यार्थी दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचा निकाल पाहू शकतात.
रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी
संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे
दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली होती. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात त्यासाठी 5 हजार 130 मुख्य परीक्षा केंद्र होती.
TV 9 मराठीवर असा पहा तुमचा दहावीचा निकाल
बोर्डाच्या इतिहासात दहावीचा निकाल प्रथमच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता.
राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेला 16.11 लाख विद्यार्थी बसले होते. त्यात 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली होत्या. मागील वर्षी पेक्षा यावर्षी दहावीची परीक्षा लवकर झाली होती. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागत आहे.
तुम्हाला तुमचा दहावीचा निकाल tv9marathi.com वर पाहाता येऊ शकतो. दहावीचा निकाल पाहायचा कसा? काय आणि कशी प्रोसेस आहे? हे सोप्पं भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घ्या.
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा, रिझल्ट लागला की लगेच मेसेज किंवा ईमेलवर तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळणार
नोंदणीसाठी एक बॉक्स दिलाय. रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर या गोष्टी तुम्हाला नोंदणीसाठी लागतील.