Pariksha Pe Charcha : नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, मन की बात मधून रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर

| Updated on: Dec 26, 2021 | 12:10 PM

नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाचा हा 84 वा भाग होता. नरेंद्र मोदी यांनी यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केल.

Pariksha Pe Charcha : नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, मन की बात मधून रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर
PM Narendra Modi
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 11 वाजता ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केल. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाचा हा 84 वा भाग होता. नरेंद्र मोदी यांनी यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केल. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना त्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

परीक्षा पे चर्चा नोंदणी 28 डिसेंबरपासून सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणं विद्यार्थ्यांशी परीक्षेपूर्वी संवाद साधण्याचं नियोजन करत असल्याचं जाहीर केलं. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 28 डिसेंबरपासून नोंदणीला सुरुवात करत आहोत. 28 डिसेंबरपासून mygov.in या वेबसाईटवर होईल. ही प्रक्रिया 28 डिसेंबर 20 जानेवारीपर्यंत सुरु राहील. यासाठी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक नोंदणी करु शकतात. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कॅप्टन वरुण सिंग यांचं पत्र प्रेरणादायी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेल्या 14 जणांना आदरांजली केली. वरुण सिंग यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संवादामध्ये केली. कॅप्टन वरुण सिंग यांनी त्यांच्या पत्रातून प्रत्येक भारतीयाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मन की  बातमधून देशासाठी झटणाऱ्या व्यक्तींना समोर आणलं

माझ्या सर्व प्रिय देशवासियांना नमस्कार, तुम्ही 2021 वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असाल. प्रत्येक जण, संघटना नव्या वर्षात नवा संकल्प करत असतो. गेल्या 7 वर्षांपासून मन की बात सुरु आहे. मी 7 वर्षाच्या कालावधी माझ्या सरकारच्या कामाबद्दल बोलू शकतो. मात्र, माध्यमापासून दूर असलेले कोट्यवधी लोक देशाच्या भविष्यासाठी काम करत आहेत. मन की बात अशा लोकांच्या संकल्पना देशवासियापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो,असं नरेंद्र मोदी म्हणाले.

इतर बातम्या: 

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी

Narendra Modi Mann ki baat live address appeal students parents and teachers to register Pariksha Pe Charcha from 28 December