
केंद्र सरकारने मंगळवारी एक महत्वाचा निर्णय घेतला. NEET-PG 2025 साठी क्वालिफाइंग कट-ऑफ रेट खूप कमी केला. यामुळे मेडिकल कॉलेजेसमध्ये 9 हजारपेक्षा अधिक रिकामी असलेली PG मेडिकल सीट्स भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. देशात डॉक्टरांची मोठ्या संख्येने कमतरताना असताना हा निर्णय घेण्यात आलाय. नव्या निकषांनुसार सामान्य वर्ग आणि EWS उमेदवारांसाठीची क्वालिफाइंग पर्सेंटाइल 50th पेक्षा कमी करुन 7th पर्सेंटाइल करण्यात आलं आहे. बेंचमार्क विकलांग जनरल कॅटेगरीमध्ये (PwBD) 45th ने घटवून 5th पर्सेंटाइल करण्यात आलं आहे. याचप्रमाणे SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी पर्सेंटाइल 40 ने घटवून 0 करण्यात आलं आहे.
या निर्णयाची माहिती नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशंस इन मेडिकल सायसेजने (NBEMS) दिली. एडमिशनची पात्रता वाढवण्यासाठी सर्व कॅटेगरीच्या क्वालिफाइंग पर्सेंटाइल मध्ये बदल करण्यात आला आहे. या वर्षी NEET-PG मध्ये प्रवेशासाठी 2.4 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला. पण हाय कट-ऑफमुळे हजारो सीट्स रिकाम्या राहिल्या. देशभरात 65 हजार ते 70 हजार PG मेडिकल सीट्स आहेत. दर सातपैकी एक सीट रिकामी राहिली तर टीचिंग रुग्णालय कमकुवत होईल. आरोग्य सेवांवर दबाव वाढेल. खासकरुन सरकारी संस्था रेजिडेंट डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
मेरिट लिस्ट बनवणं हा प्रवेश परीक्षेचा उद्देश
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) प्रतिनिधीमंडळाने 12 जानेवारीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांना एक पत्र लिहिलं होतं. यात मोठ्या संख्येने रिकामी असलेल्या जागा भरण्यासाठी कट-ऑफमध्ये संशोधनाची मागणी करण्यात आली होती. मेरिट लिस्ट बनवणं हा प्रवेश परीक्षेचा उद्देश आहे असं NBEMS च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
म्हणून कट ऑफ कमी केला
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘तुम्ही 9 ते 10 हजार PG सीट वाया जाऊ देऊ शकत नाही’ पर्सेंटाइल कमी केल्याच्या निर्णयावर टीका होईल. आधी कट ऑफ अनेक टप्प्यांमध्ये कमी व्हायचे. यावेळी उशीर झालाय. आमचं लक्ष सीट लवकर भरण्यावर आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं. कट-ऑफमधील बदलाचा परीक्षेतील स्कोर किंवा रँकिंगवर काही बदल होत नाही, असं NBEMS ने स्पष्ट केलं. काउंसलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी कोण-कोण योग्य आहे हेच यातून ठरतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परसेंटाइल सिस्टिमचा वापर आधी क्वालिफाइड डॉक्टर्सना रँक देण्यासाठी केला जायचा. PG सीट्स भरण्यासाठी पर्याप्त उमेदवार मिळावेत यासाठी कट ऑफ कमी करण्यात आलय.