NEET PG जागा वाटपाचा निकाल जाहीर! डायरेक्ट लिंक

एमसीसीने आज, 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता एनईईटी पीजी समुपदेशन निकाल जाहीर केलाय.

NEET PG जागा वाटपाचा निकाल जाहीर! डायरेक्ट लिंक
NEET PG allotment
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 30, 2022 | 6:06 PM

नीट पीजी समुपदेशन 2022 राऊंड 1 जागा वाटप सुधारित निकाल जाहीर करण्यात आलाय. एनईईटी पीजी राऊंड 1 निकाल 2022 ची लिंक mcc.nic.in वैद्यकीय समुपदेशन समितीच्या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली गेलीये. एमसीसीने आज, 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता एनईईटी पीजी समुपदेशन निकाल जाहीर केलाय. एनईईटी पीजी समुपदेशनात उपस्थित असलेले उमेदवार आता त्यांची जागा वाटप यादी डाउनलोड करू शकतात.

एनईईटी पीजी अलॉटमेंट निकाल कसा डाउनलोड करावा?

  1. mcc.nic.in एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होम पेजवर तुम्हाला एनईईटी पीजी सीट अलॉटमेंट राउंड 1 रिझल्ट 2022 लिंकची नोटीस मिळेल. क्लिक करा आणि वाचा.
  3. त्यानंतर होम पेजवरील NEET PG Seat Allotment Round 1 Result 2022 Link लिंकवर क्लिक करा.
  4. आपला एनईईटी पीजी रोल नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी पिन भरून साइन इन करा.
  5. आपण लॉगइन करताच आपला निकाल स्क्रीनवर दिसेल. त्यावर क्लिक करून ओपन करा.
  6. निकालात दिलेली सर्व माहिती नीट तपासून पाहा आणि कॉपी डाऊनलोड करा. त्याची प्रिंट काढून घ्या.

हा तात्पुरता निकाल असल्याचे वैद्यकीय समुपदेशन समितीने म्हटले आहे. यावर येणाऱ्या आक्षेपांची दखल घेतल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांना वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डायरेक्ट लिंक – NEET PG Round 1 Allotment Result