NEET: पुन्हा परीक्षा घ्या…! नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकारामुळं संतप्त विद्यार्थी सुप्रीम कोर्टात

| Updated on: Sep 29, 2021 | 4:15 PM

नीट यूजी परीक्षा 2021 मध्ये झालेल्या गैरप्रकारामुळं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय. विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.

NEET: पुन्हा परीक्षा घ्या...! नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकारामुळं संतप्त विद्यार्थी सुप्रीम कोर्टात
सर्वोच्च न्यायालय
Follow us on

नवी दिल्ली: नीट यूजी परीक्षा 2021 मध्ये झालेल्या गैरप्रकारामुळं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय. विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 12 सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत एनटीएला पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. 12 सप्टेंबरला सीबीआयनं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये छापे टाकत अनेकांना अटक केली होती.

नीट यूजी परीक्षा गैरप्रकारात मोठी आर्थिक उलाढाल

नीट परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी अ‌ॅड.ममता शर्मा यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे. ज्या दिवशी NEET UG परीक्षा घेण्यात आली त्या दिवशी सीबीआयने चार आरोपी व्यक्ती आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला होता. काही ठिकाणी डमी उमेदवारांचा वापर करून परीक्षेत फेरफार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. काही ठिकाणी 30 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतची डील झाल्याचं समोर आलं होतं.

नागपूरमध्ये 50 लाखांची डील

नागपूरमध्ये ‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा समोर आला आहे. 50 लाखांच्या मोबदल्यात मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. आर. के. एज्युकेशनच्या परिमल कोतपल्लीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील आणखी काही कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

नागपूरमधील पाच मोठ्या क्लासेसवर सीबीआयचे छापे

नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळं नागपूरमधील कोचिंग क्लासेस प्रकरणी नागपूरातील कोचिंग क्लासेसवर साबीआयनं छापे टाकले होते. सीबीआयनं धाडीत काही कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे. नागपूरातील पाच मोठ्या कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या. दिल्लीतील सीबीआयच्या टीमचं धाडसत्र अवलंबलं होतं. नागपुरातील गणेशनगर,

जयपूरमध्येही नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळं 8 जणांना अटक

देशभरात विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा पार पडली. परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती. जयपूर पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. परीक्षार्थीसह पोलिसांनी तिच्या कुटंबातील सदस्य, परीक्षा केंद्र सुपरवायझर आणि इतरांना अटक केली होती. जयपूर पोलिसांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची डील 30 लाखांना ठरल्याची माहिती दिली होती.

लाईव्ह लॉनं दिलेल्या माहितीनुसार याचिकेमध्ये शिक्षण मंत्रालय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) यांना परीक्षेदरम्यान सुरक्षा संबंधी उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, असंही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. परीक्षा आयोजित करण्यासाठी उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी,जॅमरचा वापर करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर


NEET UG 2021 aspirants file petition in supreme court to conduct reexam