‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा, मेडिकल प्रवेशासाठी 50 लाखांची डील, नागपुरातील कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचं आयोजन केलं जातं. नागपूरमध्ये नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडं झालं आहे. नीट परीक्षा 12 सप्टेंबरला देशभरातील 202 शहरातील परीक्षा केंद्रावर पार पडली.

‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा, मेडिकल प्रवेशासाठी 50 लाखांची डील, नागपुरातील कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर
सीबीआय
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 12:05 PM

नागपूर: देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचं आयोजन केलं जातं. नागपूरमध्ये नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडं झालं आहे. नीट परीक्षा 12 सप्टेंबरला देशभरातील 202 शहरातील परीक्षा केंद्रावर पार पडली. सीबीआयनं गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये छापे टाकले होते. त्यावेळी नागपुरातील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केली होती. आता समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. नागपूरमधील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही सीबीआयनं अटक केल्याचं समोर आलं आहे. आर के एज्युकेशनच्या परिमल कोतपल्लीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमधील आणखी काही कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

50 लाखांची डील?

नागपूरमध्ये ‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा समोर आला आहे. 50 लाखांच्या मोबदल्यात मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. आर के एज्युकेशनच्या परिमल कोतपल्लीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील आणखी काही कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

सीबीआयच्या रडारवर कोचिंग सेंटर

नीट परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी सीबीआयनं नागपूरमध्ये छापे टाकले होते. नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली होती. मेडीकल कॅालेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याचं उघड झालं होतं. दिल्लीतील सीबीआयच्या टीमने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर छापा टाकला होता. नागपूरमधील आणखी कोचिंग क्लासेस देखील सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे. यामुळे नागपूरमधील कोचिंग क्लासेसचे धाबे दणाणले आहेत.

कोचिंग क्लासेसच्या संचालकाही अटक

सीबीआयनं सक्करदरा परिसरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही अटक केल्याची माहिती आहे. 12 सप्टेंबरला झालेल्या नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी अटक झाली असल्याचं कळतंय.

नागपूरमधील पाच मोठ्या क्लासेसवर सीबीआयचे छापे

नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळं नागपूरमधील कोचिंग क्लासेस प्रकरणी नागपूरातील कोचिंग क्लासेसवर साबीआयनं छापे टाकले होते. सीबीआयनं धाडीत काही कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे. नागपूरातील पाच मोठ्या कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या. दिल्लीतील सीबीआयच्या टीमचं धाडसत्र अवलंबलं होतं. नागपुरातील गणेशनगर, नंदनवन, आझमशाहा चौकातील क्लासेसवर छापे टाकण्यात आले होते. ही कारवाई पुढं देखील सुरु राहण्याची शक्यता आहे.

जयपूरमध्येही नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळं 8 जणांना अटक

देशभरात विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा पार पडली. परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती. जयपूर पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. परीक्षार्थीसह पोलिसांनी तिच्या कुटंबातील सदस्य, परीक्षा केंद्र सुपरवायझर आणि इतरांना अटक केली होती. जयपूर पोलिसांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची डील 30 लाखांना ठरल्याची माहिती दिली होती.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

CBI will be raid on Coaching class for malpractice in NEET UG exam dummy student case

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.