NEET परीक्षेत मोठा घोटाळा? जळगावात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; सर्वोच्च न्यायालयात धाव

नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे सांगितले जातंय. विद्यार्थ्यांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. हेच नाही तर परीक्षा रद्द करावी, अशीही मागणी केली जातंय. NEET परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. आता या परीक्षेच्या विरोधात विद्यार्थी हे रस्त्यावर उतरल्याचे देखील बघायला मिळतंय.

NEET परीक्षेत मोठा घोटाळा? जळगावात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; सर्वोच्च न्यायालयात धाव
NEET exam
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 1:08 PM

NEET परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. हेच नाही तर आता विद्यार्थ्यांनी थेट नीट परीक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीये. दोन विद्यार्थ्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आलीये. नीट परीक्षेचा मुद्दा लोकसभेत मांडणार असल्याचे राहुल गांधी यांच्याकडूनही स्पष्ट करण्यात आलंय. मोठा गोंधळ या परीक्षेत झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. हेच नाही तर अनेकांना या परीक्षेत अधिकचे मार्क पडल्याचे देखील दिसत आहे. नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे देखील बघायला मिळतंय. देशभरातून विद्यार्थ्यांमध्ये रोष बघायला मिळतोय.

जळगावच्या चाळीसगावमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. चाळीसगावमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी नीट 2024 चा पेपर लीक झाल्याच्या आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. झालेली नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नीट परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. विद्यार्थ्यानी निदर्शने केली असून निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची मागणी करण्यात आलीये. नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुक निदर्शने सुरु केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आणि हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेत निषेध व्यक्त केलाय.

नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात ABVP देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलंय. नीटच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची निदर्शने बघायला मिळत आहेत. निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची देखील मागणी विद्यार्थ्यांची आहे. यावेळी विद्यार्थी घोषणाबाजी करताना देखील दिसले.

नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. काही विद्यार्थ्यांना 720 पेक्षाही अधिक मार्क पडल्याने हा प्रकार उघडकीस आलाय. यंदा झालेल्या या परीक्षेचा वाद वाढताना दिसतोय. परीक्षेच्या आयोजनावरूनच वादाला सुरुवात झाली होती. परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे विद्यार्थ्यांसह पालकांच्या देखील नजरा लागल्या आहेत.

Non Stop LIVE Update
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी.
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?.
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ.
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.