JEE Main Result Live : महाराष्ट्राच्या अभिजीत तांबटला जेईई मेनची रँक 1

| Updated on: Sep 15, 2021 | 5:59 PM

JEE Main Result 2021 : जेईई मेन चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी करेल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आजपासून नोंदणी सुरु होत आहे.

JEE Main Result Live : महाराष्ट्राच्या अभिजीत तांबटला जेईई मेनची रँक 1
जेईई मेन
Follow us on

JEE Main Result: जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.  तर, 44 उमेदवारांना 100 एनटीए परफेक्ट गुण मिळाले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Sep 2021 08:04 AM (IST)

    महाराष्ट्राचा अभिजीत तांबटला जेईई मेनची रँक 1

    महाराष्ट्राचा अभिजीत तांबट यानं जेईई मेनची  1 रँक मिळाली असून तो नवी मुंबईतील सानपाडा येथील शाळेचा विद्यार्थी आहे.

  • 15 Sep 2021 07:25 AM (IST)

    मातृभाषेत परीक्षेचं आयोजन

    नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन जेईई अ‌ॅडव्हान्सड एएटी परीक्षेच्या निकालानंतर सुरू होईल. जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राचा निकाल jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे .


  • 15 Sep 2021 07:24 AM (IST)

    जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी सुरु होणार

    चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीएनं ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी केली आहे. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु होत आहे.

  • 15 Sep 2021 07:23 AM (IST)

    334 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन

    नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. देशातील 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान पार पडली. जेईई मेन परीक्षेतील टॉप अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एक पेक्षा अधिक सत्राची परीक्षा दिली असेल त्यांचं सर्वाधिक गुण ग्राह्य धरले जातील.

  • 15 Sep 2021 07:22 AM (IST)

    जेईई मेन 2021 चा अंतिम निकाल कसा पाहायचा?

    जेईई मेन 2021 चा अंतिम निकाल कसा पाहायचा?

    स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
    स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
    स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
    स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
    स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

  • 15 Sep 2021 07:17 AM (IST)

    जेईई मेन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 44 विद्यार्थ्यांना 100 एनटीए गुण