IIT Bombay : स्वयंम पोर्टलवर अँड्राईड ॲप डेव्हलमेंट कोर्स सुरु होणार, आयआयटी मुंबई मदत करणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

| Updated on: May 17, 2021 | 5:35 PM

IIT Bombay फ्री ऑनलाइन कोर्ससाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम घेऊन आलेय. Ramesh Pokhariyal IIT Bombay

IIT Bombay : स्वयंम पोर्टलवर अँड्राईड ॲप डेव्हलमेंट कोर्स सुरु होणार, आयआयटी मुंबई मदत करणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
रमेश पोखरियाल निशंक
Follow us on

IIT Bombay नवी दिल्ली: इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) फ्री ऑनलाइन कोर्ससाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम घेऊन आलेय. IIT बॉम्बे अँड्रॉइड अ‌ॅप डेव्हलपमेंटवर मोफत ऑनलाईन ट्यूटोरियल (Free Online Tutorials) उपलब्ध करुन देणार आहे. इच्छुक उमेदवार अ‌ॅप डेव्हलमेंट कोर्ससाठी स्वयम SWAYAM पोर्टल वर रजिस्ट्रेशन करु शकतात. ही माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) यांनी ट्वीट करुन दिली आहे. (Ramesh Pokhariyal Said IIT Bombay will provide free tutorial for free android app course on SWAYAM Portal)

कोटलिनचा वापर करणार

आयआयटी बॉम्बे प्रोग्रामिंग भाषा कोटलिनचा वापर करुन अँड्रॉइड अ‌ॅप डेव्हलपमेंट वर एक ऑनलाईन कोर्स सुरु करणार आहे. यामध्ये जेटब्रेनद्वारे बनवलेले जावा आणि वर्चुअल मशीनवर चालणारे अँड्रॉइड अ‌ॅप बनवणं शिकवलं जाणार आहे. सध्याच्या काळात कोटलिन ही लोकप्रिय ओपन-सोर्स प्रोग्रामिंग भाषा बनली आहे. यामधील अ‌ॅप डेव्हलपमेंट कोर्स विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढवणारा ठरेल.

अ‌ॅप डेव्हलमेंट अभ्यासक्रमासाठी नोंदणी कशी करणार?

स्टेप 1: रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट onlinecourses.swayam2.ac.in वर भेट द्या
स्टेप 2: वेबसाइटवरील होम पेजवर दिलेल्या register for various online courses या लिंक वर क्लिक करा
स्टेप 3: आता “sign in / register” लिंक वर क्लिक करा.
स्टेप 4: Facebook, Google, Microsoft याद्वारे किंवा SWAYAM account द्वारे लॉगीन करा.
स्टेप 5: यानंतर तुम्ही या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करु शकता.

अभ्यासक्रमात नेमकं काय?

आयआयटी बॉम्बे अँड्रॉइड अ‌ॅप डेव्हलपमेंट कोर्ससाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याला 10 ऑडियो व्हिडीओृस्पोकन ट्यूटोरियल उपलब्ध होतील. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) द्वारे मान्यता देण्यात आलीय. या कोर्स का संचालन प्रोफेसर कन्नन एम मौदगल्या हे करतील. ते आयआयटी बॉम्बेशी संबंधित आहेत. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला अर्ज करु शकतात. हा कोर्स 8 आठवड्यांमध्ये पूर्ण करावा लागतो.

संबंधित बातम्या

येत्या 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह, शुभारंभावेळीच अ‌ॅप झालं होतं डाऊन

(Ramesh Pokhariyal Said IIT Bombay will provide free tutorial for free android app course on SWAYAM Portal)