AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

येत्या वर्षात काही ठराविक मोबाईलमध्ये WhatsApp बंद होण्याची शक्यता आहे. (WhatsApp Will Stop Working on These Android Phones)

येत्या 1 जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?
| Updated on: Dec 28, 2020 | 10:44 PM
Share

मुंबई : व्हॉट्सॲप हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय ॲप म्हणून ओळखलं जाते. मात्र काही अँड्रॉईड फोन आणि आयफोन युजर्सला व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही. कारण काही ठराविक फोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होणार आहे. त्यामुळे त्या युजर्सला त्यांचे फोन अपग्रेड करावे लागणार आहे. (WhatsApp Will Stop Working on These Android Phones)

जगभरात 2021 चे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या वर्षात काही ठराविक मोबाईलमध्ये WhatsApp बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे Samsung Galaxy S2 किंवा iPhone 4 असेल, तर तुम्हाला 1 जानेवारीपासून त्यात व्हॉट्सॲप वापरण्यास अडचण येऊ शकते. कदाचित व्हॉट्सॲप सुरु होण्यासही अडचणी येऊ शकतात.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, Android 4.0.3 किंवा यापेक्षा कमी Version वर चालणाऱ्या अँड्राईड स्मार्टफोनवरील WhatsApp बंद होणार आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे या Version वर चालणारे अँड्राईड फोन असतील, तर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यासाठी ते अपग्रेड करावे लागणार आहे.

त्यासोबतच जर तुम्ही आयफोन युजर्स असाल आणि तुमच्याकडे iOS 9 किंवा यापेक्षा जुन्या वर्जनचे सॉफ्टवेअर असेल, तर ते तुम्हाला अपडेट करावा लागेल. त्याशिवाय जर तुमचा फोन फार जुना झाला असेल किंवा तो अपडेट होऊ शकत नसेल, तर मात्र तुम्हाला नवा फोन खरेदी करावा लागू शकतो.

Google Nexus S, HTC Desire S आणि Sony Ericsson Xperia Arc यासारखे स्मार्टफोन काही वर्षांपूर्वी फार प्रसिद्ध होते. मात्र कंपनीने या फोनमध्ये नवीन अपडेट देण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान WhatsApp ने कोण-कोणत्या सुविधा बंद होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच  व्हॉट्सॲप विविध मोबाईल कंपनीकडून याबाबतची माहिती घेईल. त्यानंतर कोणकोणत्या मोबाईलमध्ये  WhatsApp ची सेवा बंद  होईल, याची यादी जाहीर करेल. (WhatsApp Will Stop Working on These Android Phones)

संबंधित बातम्या : 

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.