नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षा दिलेले 300 विद्यार्थ्यांच्या निकालात अनुपस्थित असल्याचा शेरा

| Updated on: Aug 06, 2021 | 11:04 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या परीक्षा विभागाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. विद्यापीठाची परिक्षा देऊनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुपस्थित असल्याचा उल्लेख असल्यानं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षा दिलेले 300 विद्यार्थ्यांच्या निकालात अनुपस्थित असल्याचा शेरा
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या परीक्षा विभागाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. विद्यापीठाची परिक्षा देऊनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुपस्थित असल्याचा उल्लेख असल्यानं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. बीए अभ्यासक्रमाच्या 300 च्या वर तक्रारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडं दाखल झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील बीएच्या निकालामध्ये परीक्षा विभागाच्या चुकीमुळं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढल्याचं समोर आलंय. विद्यापीठानं नुकताच निकाल जाहीर केल्यानंतर गुणपत्रीकेत अनुपस्थित दाखवल्याने विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

300 विद्यार्थ्यांच्या तक्रारी

परीक्षा देऊनही गैरहजर दाखवल्यानं विद्यापीठाकडे बीएच्या अभ्यासक्रमाच्या 300 च्या वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या तक्रारींवर विद्यापीठ प्रशासन काय मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी परीक्षा

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात यंदा सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. परीक्षांचं आयोजन करण्याच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. त्यामुळे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केल्या जातील असं सांगितलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरनं दोन महिन्यांपूर्वी बीए प्रथम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या.

2 ऑगस्टला निकाल जाहीर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या वतीनं विविध परीक्षांचे निकाल 2 ऑगस्टला जाहीर करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये अनुपस्थित दाखवल्यानं विद्यार्थ्यांना धक्काचं बसला आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळं विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.

विद्यार्थ्यांच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांनी आता परीक्षा विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. जवळपास 300 विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. विद्यापीठाच्या एका चुकीमुळे 300 विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.

इतर बातम्या:

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय, 2.94 लाख कोटी रुपयांची तरतूद

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur university exam department showing absent mark on result on students who appear for exam