ICSE, ISC Board Exam 2021 : दहावी व बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, अधिकृत वेबसाईटवर जारी

| Updated on: Mar 09, 2021 | 10:27 AM

बारावीची परीक्षा आता एप्रिल, 2021 ते 18 जून, 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा 4 मे ते 7 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार. (Revised timetable of 10th and 12th examinations announced, released on official website)

ICSE, ISC Board Exam 2021 : दहावी व बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, अधिकृत वेबसाईटवर जारी
आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
Follow us on

नवी दिल्ली : काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आयसीएसई (इयत्ता 10) व आयएससी (इयत्ता 12) परीक्षा 2021 चे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक अधिकृत वेबसाईट cisce.org वर उपलब्ध आहे. जे विद्यार्थी या परीक्षा देत आहेत त्यांनी वेबसाईटवर जाऊन सुधारीत वेळापत्रक तपासू शकता. वेबसाईटवर जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा आता एप्रिल, 2021 ते 18 जून, 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा 4 मे ते 7 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तारखांनुसार वेळ तपासू शकतात. (Revised timetable of 10th and 12th examinations announced, released on official website)

या स्टेपने तपासा सुधारीत वेळापत्रक

दहावी व बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनचे अधिकृत संकेतस्थळ cisce.org ला तपासावे. आयसीएसई आणि आयएससी परीक्षांच्या सुधारीत वेळापत्रकाचे दोन वेगवेगळ्या लिंक मुख्यपृष्ठावरील नोटिस बोर्ड विभागात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे. आता एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवार आपापल्या वर्ग परीक्षा 2021 चे तपशील वेळापत्रक तपासू शकतात. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक डाऊनलोड करावे पाहिजे आणि हार्ड कॉपी प्रिंट काढावी.

प्रॅक्टिकल परीक्षेचे वेळापत्रक शाळांकडून जाहीर होणार

वेळापत्रकासोबतच विद्यार्थ्यांसाठी सूचनाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. त्याचबरोबर, प्रॅक्टिकल परीक्षेचे वेळापत्रक संबंधित शाळांकडून जाहीर केले जाईल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन सूचना तपासू शकता. विशेष म्हणजे आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा सामान्यत: फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येतात. परंतु, कोरोना महामारीमुळे या वेळी परीक्षा उशीरा होत आहेत. (Revised timetable of 10th and 12th examinations announced, released on official website)