दुसऱ्या सत्राची परीक्षा कधी? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा

| Updated on: May 03, 2021 | 10:34 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. Savitribai Phule Pune University Exams

दुसऱ्या सत्राची परीक्षा कधी? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्र परीक्षांबाबत महत्वाची घोषणा केली आहे.दुसऱ्या सत्राची परीक्षा ही जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Savitribai Phule Pune University will conduct second semester exam in June )

मे महिन्याच्या अखेरपर्यंत वेळापत्रकाची घोषणा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा 15 मे पर्यंत संपणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून जून महिन्यात दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या सत्राचं वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती आहे. मे महिन्यातील अखेरच्या काही दिवसांमध्ये परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर होऊ शकते.

पुणे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र तीन जिल्ह्यांमध्ये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे.
पुणे, अहमदनगर ,नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं आहेत. विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांना पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थी बसणार आहेत.

परीक्षा होणार ऑनलाइनच !

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुंची ऑनलाईन बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील, असा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणं महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येत आहेत.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं होतं .

ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होणार नाहीत

तेराही अकृषी विद्यांपीठात ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

बारावीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं?

आधी म्हणाले परीक्षा पुढे ढकला, ऑनलाईन घ्या; आता बारावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द करण्यासाठी आक्रमक

(Savitribai Phule Pune University will conduct second semester exam in June )