बारावीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं?

बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे. (HSC examination is going to be held, what exactly was decided in the cabinet meeting)

बारावीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं?
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई : देशात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहवीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान उद्या रात्री 8 वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कडक लॉकडाऊनचा आग्रह केला. (HSC examination is going to be held, what exactly was decided in the cabinet meeting)

बारावीची परीक्षा होणार

राजेश टोपे यांनी दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट नेमकं काय?

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

1. महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन करणार

2. उद्या मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करणार

3. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणार

4. बारावीची परीक्षा होणारच – राजेश टोपे

5. कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली – एकनाथ शिंदे

6. नियमावली लवकरच जाहीर केली जाईल – अस्लम शेख

7. राज्यात जिल्हाबंदी होणार, प्रवासावर निर्बंध येणार

8. परदेशी लस लसीकरणासाठी वापरणार – टोपे

9. लसीकरणाचा वेग वाढविण्याची केंद्राकडे मागणी – टोपे

10. अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासाची मुभा मिळणार (HSC examination is going to be held, what exactly was decided in the cabinet meeting)