मोठी बातमी, विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेणार, उदय सामंत यांची घोषणा

मोठी बातमी, विद्यापीठांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेणार, उदय सामंत यांची घोषणा Maharashtra Uday Samant University exam online mode

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:13 PM, 22 Apr 2021
मोठी बातमी, विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेणार, उदय सामंत यांची घोषणा
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

मुंबई: राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असं उदय सामंत म्हणाले.  (Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant said remaining University exam will conduct online mode)

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

विद्यापीठांतर्फे 37 लाख विद्यार्थ्यांच लसीकरण

उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं निकाल लवकर लागेल. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्याचं लसीकरण होणं गरजेचे आहे.

प्राध्यापक भरतीबाबत चर्चा

लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झालीय. ही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये असं उदय सामंत म्हणाले.

ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होणार नाहीत

तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले.

एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत

एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसं आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता नाही. लस व रेमडेसिव्हीरचं समान वाटप केंद्राने करावे, असं उदय सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या:

बारावीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं?

आधी म्हणाले परीक्षा पुढे ढकला, ऑनलाईन घ्या; आता बारावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द करण्यासाठी आक्रमक

(Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant said remaining University exam will conduct online mode)