रणजितसिंह डिसलेंचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा, वर्षा गायकवाड यांच्याकडून रजा मंजुरीचे आदेश

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा डिसले गुरुजींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रणजितसिंह डिसलेंचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा, वर्षा गायकवाड यांच्याकडून रजा मंजुरीचे आदेश
रणजित डिसले गुरुजी (फाईल फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 1:59 PM

नाशिक : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा डिसले गुरुजींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज मंजूर करण्याचे शिक्षण विभागाला आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. उच्च शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी रजेचा अर्ज केला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रणजित डिसलेंना फोन केल्याचं देखील समोर आलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू, आणि वर्षा गायकवाड दोघांनी गुरूजींना फोनवरून माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींसह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे.हा वाद नेमका काय आणि कसा निर्माण झाला याबाबत चौकशी करणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

रणजितसिंह डिसले यांच्याकडून वर्षा गायकवाड आणि अजित पवार यांचे आभार

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रजा मंजूर करण्याचे आदेश दिल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.  25 जानेवारीपर्यंत अमेरिकेला जाण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पुर्तता करणार आहे.  नियोजित अर्जावर रजा मंजूर करण्यात येईल. फुल ब्राईट स्कॉलरशिपपासून मी मुकणार नाही आणि  अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत आहे, असंही रणजितसिंह डिसले म्हणाले.

वर्षा गायकवाड यांच्याकडून चौकशीचे आदेश

रणजितसिंह डिसले गुरुजींसह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.  हा वाद नेमका काय आणि कसा निर्माण झाला याबाबत चौकशी करणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींना दिलासा देत सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.

इतर बातम्या: 

Maharashtra School Reopen : सोलापूर, बुलडाणा ते बीड, शाळा कधी सुरु होणार? स्थानिक प्रशासनाचे आदेश काय?

रणजितसिंह डिसले रजा प्रकरणामुळं राजीनामा देण्याच्या मनस्थितीत; राजीनामा देणारा व्यक्ती आधी सांगत नाही: शिक्षणाधिकारी


School Education Minister Varsha Gaikwad said Ranjitsinh Disale leave application approved now Disale can go to America