SSC, CHSL Exam 2022 : उमंग ॲपद्वारे तुम्ही सुद्धा भरू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया !

| Updated on: Feb 19, 2022 | 9:57 PM

SSC CHSL Exam 2022 : अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. स्पर्धा परीक्षा चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी प्रत्येक जण जिवाचे रान करत असतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) ने नुकतीच घोषणा केली आहे की, आता उमेदवार उमंग मोबाइल ॲपच्या (UMANG mobile App) माध्यमातून SSC, CHSL परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे.

SSC, CHSL Exam 2022 :  उमंग ॲपद्वारे तुम्ही सुद्धा भरू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया !
Follow us on

SSC CHSL Exam 2022 : अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. स्पर्धा परीक्षा चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी प्रत्येक जण जिवाचे रान करत असतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) ने नुकतीच घोषणा केली आहे की, आता उमेदवार उमंग मोबाइल ॲपच्या (UMANG mobile App) माध्यमातून संयुक्त उच्च माध्यमिक (10 + 2) पातळीवरील परीक्षा 2021 किंवा सीएचएसएल परीक्षा 2021 साठी अर्ज करू शकतात. एसएससीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये असे सांगितले आहे की, एक संयुक्त उच्च माध्यमिक (10 + 2) पातळीवरील परीक्षा 2021 साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लक्ष द्यावे की, तुम्ही या पुढे उमंग मोबाइल ॲपद्वारे देखील या परीक्षासाठी असलेला अर्ज भरू शकतात, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय (MeitY) भारत सरकारने चालवलेला हा एक डिजिटल इंडिया उपक्रम आहे. या उपक्रम अंतर्गत तुम्ही मोबाईल ॲप द्वारे फॉर्म भरू शकता.

अर्ज दाखल करण्याची तारीख

अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 7 मार्च 2022 आहे. अर्ज फी भरण्याची तारीख 8 मार्च आहे. चलन भरण्याची तारीख 9 मार्च आहे. तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी 11 मार्च ते 15 तारखेपर्यंतचा कालावधी असेल. एसएससी, सीएचएसएल (SSC, CHSL) ची परीक्षा मे महिन्यात होईल. परीक्षेबद्दल सर्व माहितीसाठी उमेदवारांना वेबसाईटवर देण्यात आली आहे.

असा भरा अर्ज

SSC, CHSL 2022 ऑनलाइन नोंदणी – न्यू यूजर बटन वर क्लिक करा आणि SSC CHSL ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

आवश्यक असलेले कागदपत्र स्कॅन करा.

सर्व स्कॅन केलेले कागदपत्र आता अपलोड करा .

एसएससी सीएचएसएल अर्ज 2022 भरा.

उमेदवारांना अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती भरायची आहे.

परीक्षा अर्जाची फी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल.

एसएससी सीएचएसएल 2022 अर्जातील सर्व माहिती तपासून शेवटी सबमिशन बटण वर क्लिक करा.

विविध पदांसाठी भरती

SSC CHSL 2022 परीक्षा ही एक राष्ट्रीय स्तरवरील परीक्षा आहे. ही परीक्षा देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केली जाते. उमेदवारांना एसएससी सीएचएसएल अर्ज 2022 साठी अर्ज भरताना त्यांना कोणत्या शहरात परीक्षा केंद्र हवे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. SSC CHSL परीक्षाच्या माध्यमातून आयोग भारत सरकारचे वेगवेगळे मंत्रालय / विभाग / कार्यालय आणि विविध संवैधानिक संस्था /संवैधानिक संस्थेतील लोअर डिवीजनल क्लर्क / जूनियर सचिवालय सहायक, डाक सहायक / सॉर्टिंग सहायक आणि डाटा एंट्री ऑपरेटर / ट्रिब्यूनल, इत्यादी पदाची भरती केली जाते.

संबंधित बातम्या

TET Exam Scam : टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात लाखो रुपये गोळा करण्याऱ्या 3 एजंटाना बेड्या, पुणे पोलिसांची कारवाई

MPSC Exam : एमपीएससीने मोठी भरती काढली, किती पदांची जाहिरात निघाली? वाचा एका क्लिकवर

कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती