AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TISSNET 2021 Result: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, इथे पाहा निकाल

TISSNET Result 2021: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल tiss.edu या वेबसाईटवर पाहता येईल.

TISSNET 2021 Result: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, इथे पाहा निकाल
प्रातिनिधीक फोटो
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 19, 2021 | 11:54 AM
Share

TISSNET 2021 Result नवी दिल्ली: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TATA Institute of Social Sciences)आज प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. प्रवेश परीक्षेचा निकाल टिसच्या ऑफिशियल वेबसाइईट tiss.edu वर जाहीर होणार आहे. विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. (TISSNET Result 2021 will declare today visit tiss edu in for online result )

20 फेब्रुवारीला परीक्षेचे आयोजन

टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची प्रवेश परीक्षा 20 फेब्रुवारीला झाली होती. या परीक्षेचे आयोजन देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या देशभरातील 17 केंद्रांवर परीक्षा झाली होती. मुंबई, तुळजापूर, गुवाहाटी, हैदराबाद, MGAHD नागालँड आणि चेन्नई (बनयान) येथील केंद्रावर येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी ही परीक्षा झाली होती. प्रवेश परीक्षेमध्ये बहूपर्यायी प्रश्न विचारले गेले होते.

TISSNET 2021 Result निकाल कुठे पाहणार

विद्यार्थ्यी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन TISSNET 2021 चा निकाल पाहू शकतात.

TISSNET 2021 Result साठी इथे क्लिक करा.

TISSNET Result 2021 कसा पाहणार?

विद्यार्थी पुढील स्टेपचा वापर करुन टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल पाहू शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम ऑफिशिल वेबसाईट tiss.edu ला भेट द्या.

स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या रिजल्ट लिंक वर क्लिक करा

स्टेप 3: तुमचा नोंदणी क्रमांक पासवर्ड टाकून लॉगीन करा

स्टेप 4: तुम्हाला तुमचा निकाल दिसेल

स्टेप 5: निकाल चेक करा आणि प्रिटं काढून ठेवा.

एप्रिलमध्ये अंतिम निवड यादी जाहीर होणार

आज जाहीर होणाऱ्या निकालामध्ये परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे नाव, रोल नंबर, परीक्षांचे नाव, सेक्शनसहीत गुण, एकूण गूण, पात्रता याबाबत माहिती असेल. TISSNET 2021 चा निकाल विद्यार्थ्यांनी ज्याअभ्यासक्रमांसाठी अर्ज केलाय त्यासाठी उपलब्ध असेल. TISSNET 2021 निवड झालेल्या उमेदवारांची TISS च्या दुसऱ्या टप्प्यातील अ‌ॅप्टिट्यूड आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. TISS च्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी एप्रिलमध्ये जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या:

SBI PO Prelims Result 2021: स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

(TISSNET Result 2021 will declare today visit tiss edu in for online result )

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?