UGC NET 2023 Exam Dates: यूजीसी नेट 2023 फेज 1 परीक्षेची तारीख जारी, इथे चेक करा वेळापत्रक

| Updated on: Jun 08, 2023 | 4:55 PM

उमेदवार ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील ठराविक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

UGC NET 2023 Exam Dates: यूजीसी नेट 2023 फेज 1 परीक्षेची तारीख जारी, इथे चेक करा वेळापत्रक
UGC NET 2023 june
Follow us on

मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी यूजीसी नेट 2023 जून परीक्षेसाठी पहिल्या टप्प्याच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. उमेदवार ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील ठराविक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

यूजीसी नेट परीक्षा 83 विषयांसाठी 13 जून ते 17 जून 2023 दरम्यान सीबीटी पद्धतीने घेण्यात येईल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. १३ जून रोजी वाणिज्य, शारीरिक शिक्षण आणि ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयांनी ही परीक्षा सुरू होणार असून १७ जून रोजी संगणक विज्ञान व अनुप्रयोग, हिंदी आणि समाजशास्त्र या विषयांनी ही परीक्षा संपणार आहे. ही परीक्षा कोणत्या शहरात होईल हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

एनटीए लवकरच एग्जाम सिटी इंटिमेशन स्लिप आणि प्रवेश पत्र जारी करेल. नोंदणीकृत उमेदवार त्यांच्या अर्ज क्रमांकाचा वापर करून अधिकृत वेबसाइटद्वारे डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

UGC NET 2023 परीक्षा दिनांक कसा तपासावा

  • उमेदवार ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
  • UGC NET 2023 जून टप्पा 1 परीक्षेचे वेळापत्रक होम पेजवरील लिंकवर क्लिक करा.
  • परीक्षेचे वेळापत्रक तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • आता चेक करा आणि प्रिंट आऊट घ्या.

अर्ज करण्याची प्रक्रिया 10 मे 2023 पासून सुरू झाली आणि 31 मे 2023 पर्यंत चालली. अर्जातील दुरुस्तीसाठी उमेदवारांना 2 जून ते 3 जून 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यूजीसी नेट 2 परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार एनटीए वेबसाइटला भेट देऊ शकतात. यूजीसी नेट 2022 डिसेंबरची सत्र परीक्षा घेण्यात आली आहे.