UGC NET 2022: झालेल्या चुका सुधारण्यासाठीची शेवटची संधी ! UGC NET ची करेक्शन विंडो उघडली, आज रात्रीपर्यंत मुदत

UGC NET 2022: झालेल्या चुका सुधारण्यासाठीची शेवटची संधी ! UGC NET ची करेक्शन विंडो उघडली, आज रात्रीपर्यंत मुदत
पोरांनो निकालानंतर 'ही' कागदपत्रं जीवापेक्षा जास्त जपा
Image Credit source: facebook

निर्धारित वेळेनंतर एनटीए फॉर्ममध्ये बदल करण्याची कोणतीही संधी देणार नसल्याने उमेदवारांनी वेळेत अर्जात बदल करण्याची विनंती केली आहे. यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 परीक्षा एनटीएच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे.

रचना भोंडवे

|

May 23, 2022 | 10:59 AM

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टच्या (NET) डिसेंबर 2021 आणि जून 2022 च्या सत्रासाठी करेक्शन विंडो (Correction Window) उघडली आहे. यूजीसी नेट ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार आपल्या अर्जात बदल करू शकतात. युजीसीच्या नेट अर्जात उमेदवार आज रात्रीपर्यंत म्हणजेच 23 मे रोजी रात्री 9 वाजेपर्यंत कोणताही बदल करू शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 होती.

निर्धारित वेळेनंतर एनटीए फॉर्ममध्ये बदल करण्याची कोणतीही संधी देणार नसल्याने उमेदवारांनी वेळेत अर्जात बदल करण्याची विनंती केली आहे. यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 परीक्षा एनटीएच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. मात्र, परीक्षा केंद्रांची माहिती एनटीएकडून नंतर जाहीर केली जाणार आहे. यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव

आता इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. आज 23 मे ते 27 मे दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता (मॉक अर्ज) येणार आहे. प्रत्यक्षात 30 मेपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग तर 10 वीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. राज्यातील मुंबई, ठाण्यासह, पुणे, पिंपरीचिंचवड, अमरावती आणि नागपूरमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसं पत्रक काढून शिक्षण विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची उत्कंठा संपुष्टात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

अर्ज भरण्याचा सराव म्हणजे काय?

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 30 मे पासून ही प्रक्रिया सुरू होईल. त्यापूर्वी आजपासून ते 27 मेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरताना कोणत्याही चुका होऊन अर्ज बाद होऊ नये म्हणून आजपासून ते 27 मे पर्यंत मॉक डेमो रजिस्ट्रेशन म्हणजे अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें