AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC NET Exam: जे फॉर्म भरू शकले नाहीत त्यांचा मान राखून NTA ने तारीख पुढे ढकलली ! पोरांनो आता तरी फॉर्म भरा…

या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. अर्जदार यूजीसी नेट अर्ज (UGC NET 2022 Applicaion ) ऑनलाइन पद्धतीनेच जमा करू शकतात. यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.

UGC NET Exam: जे फॉर्म भरू शकले नाहीत त्यांचा मान राखून NTA ने तारीख पुढे ढकलली ! पोरांनो आता तरी फॉर्म भरा...
CUET PG 2022Image Credit source: tv9
| Updated on: May 23, 2022 | 11:48 AM
Share

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली (Last Date Postponed) आहे. यूजीसीच्या राष्टीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आता अर्ज प्रक्रिया 30 मे 2022 पर्यंत सुरु राहील. याआधी अर्ज करायची शेवटची तारीख 20 मे 2022 होती जी आता 30 मे करण्यात आलीये. दरम्यान NTA कडून उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरु करण्यात आलीये. या विंडोवर जाऊन उमेदवार आपल्या फॉर्म भरताना झालेल्या चुका सुधारू शकतो. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. अर्जदार यूजीसी नेट अर्ज (UGC NET 2022 Applicaion ) ऑनलाइन पद्धतीनेच जमा करू शकतात. यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.

UGC NET 2022 साठी अर्ज कसा करावा

  • एनटीए यूजीसी नेट ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • होम पेजवर खाली यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी या लिंकवर क्लिक करा.
  • यूजीसी नेट रजिस्ट्रेशन 2022 पूर्ण करण्यासाठी तपशील भरा आणि पासवर्ड तयार करा.
  • यूजीसी नेट 2022 अर्ज क्रमांक उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे.
  • आपल्या यूजीसी नेट 2022 अप्लिकेशन नंबर आणि पासवर्डवर लॉग इन करा आणि दिलेला कोड सबमिट करा.
  • युजीसी नेट अर्ज 2022 भरा.
  • आता स्कॅन केलेला फोटो आणि सही अपलोड करा.
  • यूजीसी नेट 2022 नोंदणी शुल्क भरा.
  • यूजीसी नेट ऑनलाइन फॉर्म 2022 सबमिट करण्याआधी पडताळून पहा, सबमिट करा.
  • फॉर्मची प्रिंट आऊट काढा आणि जवळ ठेवा.

अर्ज शुल्क

यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या General कॅटेगरीतील उमेदवारासाठी 1100 रुपये, EWS/OBC-NCL ५५० आणि SC/ST/ PWD / Transgender साठी 275 शुल्क आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे. अर्ज दुरुस्त करण्यासाठीची विंडो 21 मे ते 23 मे या कालावधीत खुली राहणार आहे. जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.