तेलंगणात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, या कारणामुळे पोलीस महासंचालक निलंबित

तेलंगणामध्ये काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. बीआरएस पक्षाला हॅटट्रिक करण्यापासून काँग्रेसने रोखले आहे. पण या दरम्यान निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालनकांना निलंबित केले आहे. आचार सहितेचे उंलघन केल्याने ही कारवाई केल्याची सूत्रांची माहिती आहे.

तेलंगणात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, या कारणामुळे पोलीस महासंचालक निलंबित
telangana DGP
| Updated on: Dec 03, 2023 | 6:51 PM

Telangana Election Result : तेलंगणात काँग्रेसने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. या विजयादरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊल उचलले आहे. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचं अभिनंदन केल्याने डीजीपी अंजनी कुमार यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे. आचारसंहिता मोडल्याने निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार, पोलीस नोडल अधिकारी संजय जैन आणि आणखी एकाचे निलंबन केले आहे. त्यांनी तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांची एक दिवस आधी हैदराबादमध्ये भेट घेतली होती. यावेळी डीजीपींनी रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले होते.

आचार सहितेचे उल्लंघन केल्याने कारवाई

सूत्रांनी माहिती दिली की भारतीय निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता आणि संबंधित आचार सहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड भाजपने मोठा विजय मिळवला आहे, तर तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करत आहे. रविवारी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत काँग्रेसने तेंलगणात 64 जागांवर आघाडी घेतली आहे. बीआरएस 39 जागांवर पुढे आहे. एआयएमआयएम सात जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे.

रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

रेवंत रेड्डी हे सध्या 54 वर्षांचे आहेत. तेलंगणात काँग्रेससाठी मोठी शक्ती म्हणून उदयास आले आहेत. रेड्डी सध्या लोकसभा सदस्यही आहेत. तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून त्यांचे नाव पुढे केले जात आहे. रेवंत रेड्डी यांची पार्श्वभूमी भाजपच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अविभाजित आंध्र प्रदेश दरम्यान, रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये टीडीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली.