तीन राज्यांमध्ये भाजपला भोपळा, सहा राज्यांत एक आकडी जागा, मोदी लाटेच्या दाव्यांना मिटकरींचा ‘बंधारा’

| Updated on: Mar 11, 2022 | 11:56 AM

युतीचं सरकार असलेल्या चार राज्यांमध्ये भाजपला अल्प जागा मिळाल्या आहेत, भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

तीन राज्यांमध्ये भाजपला भोपळा, सहा राज्यांत एक आकडी जागा, मोदी लाटेच्या दाव्यांना मिटकरींचा बंधारा
अमोल मिटकरी, नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Election Result 2022) अनेक वृत्तवाहिन्या मोदी लाट कायम असल्याचं दाखवत आहेत. परंतु पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांची माहिती घेतली तर भाजपची (BJP) परिस्थिती वाईट आहे, असा दावा राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. 29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे, तर तीन राज्यांमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही. सहा राज्यांमध्ये भाजपला एक अंकी जागा मिळाल्या आहेत, युतीचं सरकार असलेल्या चार राज्यांमध्ये भाजपला अल्प जागा मिळाल्या आहेत, असंही मिटकरी म्हणाले आहेत. भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, अशी टीकाही मिटकरींनी केली.

अमोल मिटकरींनी दाखवलेली आकडेवारी

29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत
– उत्तर प्रदेश
– उत्तराखंड
– गोवा
– मणिपूर
– गुजरात
– कर्नाटक
– हिमाचल प्रदेश
– आसाम
– त्रिपुरा

सिक्कीममध्ये 0 जागा
मिझोराममध्ये 0 जागा
तामिळनाडूमध्ये 0 जागा

आंध्र प्रदेश – 175 पैकी 4
केरळ – 140 पैकी 1
पंजाब – 117 पैकी 3
पश्चिम बंगाल – 294 पैकी 3
तेलंगणा – 119 पैकी 5
दिल्ली – 70 पैकी 8
ओरिसा – 147 पैकी 10
नागालँड – 60 पैकी 12

ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे, तेथे भाजपच्या जागांची स्थिती आहे

मेघालय – 60 पैकी 2
बिहार – 243 पैकी 53
जम्मू काश्मीर – 87 पैकी 25

देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा आहेत. त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या 6 राज्यांतील आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, अशी टीकाही मिटकरींनी केली.

संबंधित बातम्या :

उत्तर प्रदेशात भाजपचा विजय, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, शिवसेनेला धरलं धारेवर

पाचही राज्यांमध्ये ‘हात’ रिकामे, काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, अध्यक्ष निवडीच्या हालचाली

भाजपला बंपर विजय कसा मिळाला? नरेंद्र मोदींनी सिक्रेट जगजाहीर केलं, विरोधक लक्ष देतील?