Goa Assembly Election 2022 : ‘गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत, डिपॉझिट वाचवण्यासाठी’, देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

| Updated on: Jan 11, 2022 | 7:30 PM

देवेंद्र फडणवीस पुढील चार दिवस गोव्यात ठाण मांडून असतील. दरम्यान, आज फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केलीय. गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत आणि एका तरी जागेवर अनामत रक्कम वाचावी यासाठी असल्याचा खोचक टोला, फडणवीस यांनी सेनेला लगावलाय.

Goa Assembly Election 2022 : गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत, डिपॉझिट वाचवण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
Follow us on

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजला मोठे धक्के बसत आहेत. भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे गोवा प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर फडणवीस पुढील चार दिवस गोव्यात ठाण मांडून असतील. दरम्यान, आज फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केलीय. गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत आणि एका तरी जागेवर अनामत रक्कम वाचावी यासाठी असल्याचा खोचक टोला, फडणवीस यांनी सेनेला लगावलाय.

‘गोव्यात शिवसेनेचे लढाई ही नोटासोबत असते. त्यांची लढाई ही अनामत एका जागेवर तरी रक्कम वाचवण्यासाठी असते. मला वाटत नाही की ते काही करु शकतील. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस खूप हुशार पक्ष आहे. ते इथे सगळ्यांना सोबत घेतील पण शिवसेनेला सोबत घेणार नाही. महाराष्ट्रात ते शिवसेनेसोबत असतील पण त्यांना हे माहिती आहे की गोव्यात शिवसेनेला सोबत घेतल्यास आपल्या मायनॉरिटी बेसला धक्का बसेल. त्यामुळे ते शिवसेनेला सोबत घेणार नाहीत’, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

‘गोव्यात जनमताची चोरी आम्ही होऊ देणार नाही’

‘इतकंच नाही तर गोव्यातील जनता भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत देणार आहे. त्यामुळे अन्य पक्षांना फार संधी नाहीत. तरीही त्यांनी प्रयत्न करुन पाहावेत. गोव्यात जनमताची चोरी आम्ही होऊ देणार नाही’, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ‘आम्ही जनतेत चाललोय. आमच्या रचना लावतो आहोत, केलेली काम सांगतो आहोत आणि त्या आधारावर मत मागत आहोत’, असंही फडणवीस म्हणाले.

गोव्यात भाजप स्वबळावर सत्तेत येणार- सावंत

तर ‘गोव्यात भारतीय जनता पार्टी फुल फॉर्ममध्ये आहे. जे काही सर्व्हे, ओपिनियन पोल येत आहेत, त्यात गोव्यात भाजपला स्वबळावर सत्ता मिळताना दिसत आहे’, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय.

गोव्यात भाजपला हटवण्याची गरज- पवार

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन राज्यातील निवडणूक राष्ट्रवादी लढवणार असल्याचं जाहीर केलंय. त्यात गोव्याचा उल्लेख करताना, “गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे’, असं पवार म्हणाले.

इतर बातम्या :

मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

ITR Filing : आयटी रिटर्न फाईल करायचा राहिला? मग लवकर करा, डेडलाईन 15 मार्चपर्यंत वाढवली