मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय.

मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 6:01 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (5 State Assembly Elections) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय.

‘पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तसंच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत. काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत. त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असं पवार यांनी सांगितलं.

शरद पवार स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार

त्याचबरोबर ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत. उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे. मला आनंद आहे की मेहंदी साहेब जे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचाराने राजकारण केलं. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार पक्षात येत आहेत’, असा दावाही पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

योगींच्या वक्तव्याचा पवारांकडून समाचार

उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की 80 टक्के लोक आमच्यासोबत आहेत. 20 टक्के फक्त आमच्यासोबत आहेत. अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं आहे. हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही. देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही. त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलंय.

इतर बातम्या :

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

पर्यटन स्थळांनाही 50% क्षमतेचा नियम का नाही ? हजारोंचा उदरनिर्वाह ठप्प, बंदी हटवण्याची अंबादास दानवेंची मागणी!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.