AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Results: गोव्यानंतर उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा फ्लॉप शो! राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवारही पराभवाच्या छायेत

देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांचे निकाल काही वेळातच हाती येतील. मात्र प्राथमिक कौल पाहता कोणत्या राज्यात कुणाचे बहुमत येतंय, याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राबाहेर पक्ष विस्ताराची महत्त्वाकांक्षा असलेल्या शिवसेनेला यात मोठं अपयश आल्याचं चित्र आहे.

Election Results: गोव्यानंतर उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा फ्लॉप शो! राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवारही पराभवाच्या छायेत
Image Credit source: ANI
| Updated on: Mar 10, 2022 | 5:07 PM
Share

Uttar Pradesh Elections: महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) महाराष्ट्राबाहेरही विस्तार करण्याचे ध्येय ठेवले होते. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने उमेदवार उभे करत अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी जुंपले होते. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तर गोव्यात तळ टोकून होते. मात्र गोव्यात शिवसेना सपशेल आपटी खावी लागली. तर उत्तर प्रदेशातही शिवसेनाचा फ्लॉप शो होताना दिसतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Elections) एकमेव उमेदवारही पराभवाच्या छायेत आहे. लवकरच पूर्ण निकाल हाती येतील आणि उत्तर प्रदेशात नशीब आजमावणाऱ्या या पक्षांची स्थिती स्पष्ट होईल. देशातील पाच राज्यांत शिवसेनेला मिळालेल्या यश-अपयशाचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी महापालिका निकालांवरही होणार हे निश्चित!

उत्तर प्रदेशात शिवसेनेचा फ्लॉप शो

उत्तर प्रदेशात शिवसेनेने पक्ष विस्ताराची महत्त्वाकांक्षा ठेवत तब्बल 51 जागांवर निवडणूक लढवली होती. उत्तर प्रदेशातील चारशे जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. स्वतः संजय राऊत महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उतरले होते. मात्र आज उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाचा पहिला कौल हाती येत आहे. यात भाजपाला आघाडी मिळत असून शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचा एक उमेदवार पराभवाच्या छायेत

उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव उमेदवार पराभवाच्या छायेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनुपशहर मतदार संघातून ज्येष्ठ नेते के.के. शर्मा यांना उतरवलं होतं. मात्र सुरुवातीचे जे कौल हाती येत आहेत, तेथे शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या मतदार संघात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

निवडणूक निकालाविषयीचे ANI चे ट्वीट

गोव्यात शिवसेनेची स्थिती काय?

गोव्यातदेखील शिवसेनेने चांगलाच जोर लावला होता. खासदार संजय राऊत कित्येक दिवस गोव्यात तळ ठोकून होते. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचा प्रस्ताव शिवसेनेने ठेवला होता. मात्र काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत शिवसेनेने 10 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र गोव्यातही शिवसेना सपशेल आपटल्याचे चित्र आहे.

इतर बातम्या-

सनफ्लॉवर हॉस्पिटलवर 1 लाख रुपयांचा दंड, नागपूर मनपाने का केली कारवाई?

Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? भातखळकर म्हणतात, हाणलेली फिश करी राईस..

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...