
देशातील 18 वी लोकसभा निवडणूक पार पाडली असून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा थरार पाहायला मिळाला. या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा दिलेल्या भाजपला देशातील जनतेने 300 पेक्षा कमी जागा दिल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला बॅकफूटला ढकललं. लवकरच आता देशात सरकार स्थापन होईल पण तुम्हाला माहिती का निवडून आलेल्या खासदारांना पगार किती मिळतो? पगारासह त्यांना आणखी कोणत्या सुविधा आणि भत्ते दिले जातात हे पाहणार आहोत. भारतामध्ये संसदीय लोकशाही अस्तित्त्वात आहे. यामध्ये दोन सभागृहांचा समावेश असतो, एक राज्यसभा आणि दुसरं लोकसभा होय. यातील लोकसभेत 243 आणि राज्यसभेत 250 खासदार असतात. लोकसभेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेद्वारे थेट जनतेने निवडलेले प्रतिनिधी असतात. लोकसभेच्या जागांची संख्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येच्या आधारावर निर्धारित केली जाते आणि प्रत्येक मतदारसंघातून एक खासदार निवडून येतो. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही खासदारांना सारखाच...