Modi 3.0 : मोदी पुन्हा येणार, ‘या’ तारखेला होऊ शकतो शपथविधी, राष्ट्रपती भवनाने उचललं पाऊल

Modi 3.0 : देशात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA सरकार स्थापन करु शकते. कारण एनडीएकडे 272 या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत. पुढच्या काही राजकीय घडामोडी लक्षात घेता, आता राष्ट्रपती भवनाने सुद्धा काही पावल उचलली आहेत. दोन पक्ष केंद्रात सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणार आहेत.

Modi 3.0 : मोदी पुन्हा येणार, या तारखेला होऊ शकतो शपथविधी, राष्ट्रपती भवनाने उचललं पाऊल
PM Narendra Modi
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 05, 2024 | 8:20 AM

देशासाठी कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता. 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मागच्या दोन टर्मप्रमाणे यावेळी देशाने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. पण भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत. भाजपाने एकूण 240 जागा जिंकल्या आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. यात काँग्रेसने 99 जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 272 आहे. घटक पक्ष मिळून भाजपाप्रणीत NDA कडे 272 या मॅजिक फिगर पेक्षा जास्त जागा आहेत. जेडीयूकडे 12 आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीकडे 16 खासदार आहेत. हे दोन्ही पक्ष केंद्रात सत्ता स्थापनेसाठी किंग मेकर ठरणार आहेत. हे दोन्ही पक्ष NDA मध्ये आहेत. ही भाजपासाठी जमेची बाजू आहे.

TDP चे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांना फोडण्यासाठी इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. पण सध्या, तरी या दोन्ही पक्षांनी आपण NDA सोबतच राहणार आहोत, हे स्पष्ट केलय. त्यामुळे केंद्रात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येऊ शकते. मोदी आणि भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखण हाच इंडिया आघाडीचा उद्देश आहे. इंडिया आघाडीमध्ये जवळपास 20 पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या मिळून जितक्या जागा आहेत, त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाच्या आहेत.

मोदी किती तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात?

दरम्यान राष्ट्रपती भवनाने काही पावल उचलली आहेत. त्यामुळे मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मसाठी 9 जूनला शपथविधी होण्याची शक्यता आहे. आज पासून 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे. येत्या 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात.