आधी धर्म बदलला, आता लिंगच बदललं… पुरुषाची केली बाई… निवडणूक आयोगाच्या यादीत घोळात घोळ

आज राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. जवळपास 29 महापालिकांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, पुण्यातील निवडणूक आयोगाच्या यादीत घोळ झाल्याचे समोर आले आहे.

आधी धर्म बदलला, आता लिंगच बदललं... पुरुषाची केली बाई...  निवडणूक आयोगाच्या यादीत घोळात घोळ
पुणे मतदार यादी
Image Credit source: Tv9 Network
आरती बोराडे | Updated on: Jan 15, 2026 | 2:18 PM

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) धामधुमीत मतदार यादीतील एका गंभीर चुकीमुळे एका ज्येष्ठ नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. “एखाद्या महिलेचं नाव रवींद्र असू शकतं का?” असा संतप्त सवाल विचारत त्यांना मतदान केंद्रावर त्रास सहन करावा लागला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी हा रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो असे म्हणत थेट निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे.

नेमकं प्रकार काय घडला?

Live

Municipal Election 2026

02:18 PM

Maharashtra Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच सांगितला थेट निकाल...

02:07 PM

Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांचे जाणार पद? घडामोडींना प्रचंड वेग...

02:18 PM

BMC Election 2026 Voting : उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या शेवटच्या घटका, भाजप नेत्याचं मोठ वक्तव्य

01:47 PM

BMC Election 2026 Voting : टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रुममधून बाहेर काढण्याचा आदेश, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

02:02 PM

KDMC Poll Percentage : KDMC निवडणूकीत किती टक्के झालं मतदान?

01:53 PM

BMC Election 2026 Voting : लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे

पुण्यातील एक ज्येष्ठ नागरिक रवींद्र (वय ६५+) उत्साहाने मतदान केंद्रावर पोहोचले. मतदार यादी तपासली असता त्यांचे नाव ‘रवींद्र’ असे होते. पण त्याच नावासमोर छापलेला फोटो एका अनोळखी महिलेचा होता. ही गंभीर चूक पाहून ते हैराण झाले. अधिकाऱ्यांना विचारले असता सुरुवातीला त्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. फोटोच्या चुकीमुळे मतदान नाकारले जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे रवींद्र यांनी तातडीने घरी जाऊन आपले आधार कार्ड आणले. आधार कार्ड दाखवून त्यांनी सिद्ध केले की, नाव रवींद्र आहे ते त्यांचेच आहे. ते पुरुष आहेत आणि फोटोची चूक मतदार यादीत झालेली आहे. या कायदेशीर पुराव्यानंतरच अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली.

उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगावर केली टीका

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत या घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहे. रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो. त्याची ओळखच पुसली. गणेश नाईकांचं मतदान केंद्र गायब आहे. ठाण्यात मार्गदर्शन करायला कोणी नाही. भाजपच्या उमेदवाराच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत. मतदारांची ओळख पुसली जात आहे का. लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. वन नेशनव वन इलेक्शन मोदींना हवं आहे. काहीही करून सत्ता मिळवा हे त्यांचं मिशन आहे. आज काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं लक्षात येत आहे. काहींची मतदान केंद्र गायब आहे. शाई पुसली जाते. ही शाई नाही, लोकशाही पुसली जात आहे.

आज सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून 893 वॉर्ड आहेत. यामध्ये 2,869 समावेश आहे. महापालिका निवडणुकीत 15 हजार 908 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. राज्यभरात एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदान करणार आहेत.