तमिळनाडू निवडणुकीत गाजावाजा करणाऱ्या विजयचं हिट गाणं, तब्बल 120 मिलियन…डान्स पाहून चकितच व्हाल!

सध्या सगळीकडे थलपती विजयची चांगलीच चर्चा रंगली आहे. विजयने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता विजयने राजकारणात मिळवलेल्या यशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, विजयचे एक गाणे चांगलेच चर्चेत आहे.

तमिळनाडू निवडणुकीत गाजावाजा करणाऱ्या विजयचं हिट गाणं, तब्बल 120 मिलियन...डान्स पाहून चकितच व्हाल!
Vijay Thalpathy
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2026 | 4:02 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापथी विजय यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावले आहे. त्यांनी आपल्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाकडून दोन जागांवर निवडणूक लढवली. मतमोजणीच्या कलानुसार, विजय यांचा पक्ष या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून ते सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ आहेत. थलापथी विजय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार का, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या विजयाच्या वातावरणात त्यांचे एक अनेक वर्षांपूर्वीचे गाणे सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.

तृषा कृष्णनसोबतची केमिस्ट्री पुन्हा चर्चेत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या गाण्यात थलापथी विजय त्यांची ‘कथित गर्लफ्रेंड’ अभिनेत्री तृषा कृष्णन सोबत दिसत आहेत. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आजही भुरळ घालत आहे. या सुपरहिट गाण्याचे बोल खालीलप्रमाणे आहेत:

‘होई… अप्पादी पोडू पोडू पोडू, असाथी पोडू कन्नाले…
इप्पादी पोडू पोडू पोडू, इझुथु पोडू कैय्याले…
उन्नोदा ऊरू सुत्था उप्पू मुट्टा येरिकिरेन…
उन्नोदा कन्ना पोत्थी कन्नाम्मूची आडा वरेन…
इंथा नादाई पोथुमा? इनुम कोंचम वेनुमा?’

हे अतिशय ऊर्जादायी गाणे आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. विजय यांच्या राजकीय यशानंतर चाहत्यांनी हे गाणे शेअर करत त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला राजकीय मैदानात ‘थलापथी’ विजय यांची यशस्वी घौडदौड सुरू असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या फिल्मी करिअरमधील या जुन्या आठवणींनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Follow Us