
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. काही ठिकाणी बहुमत मिळाल्याने तर काही ठिकाणी बहुमत न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले होते. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या सात महापालिकांमध्ये कोणता महापौर बसेल याची चर्चा सुरू होती. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील महापौरपदाचं चित्र क्लिअर झालं असून आता महापौर पद मिळावं म्हणून नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. त्यात अकोला आणि चंद्रपूरमधील महापौरपद ओबीसी महिलेसाठी जाहीर झालं आहे. अमरावती, नागपूरमध्ये खुल्या वर्गाचा महापौर बसणार आहे. नागरपूरमध्ये खुला वर्ग महिला हे आरक्षण आले आहे.
कोणत्या महापालिकेत कोणतं आरक्षण?
अकोला – ओबीसी महिला
चंद्रपूर – ओबीसी महिला
अमरावती – खुला वर्ग
नागपूर – खुला वर्ग महिला