Domjur Election Result 2021 LIVE: डोमजूर विधानसभा जागेवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, कोण बाजी मारणार?

| Updated on: May 02, 2021 | 6:07 AM

Assembly Election Result 2021 Live Update in Marathi: डोमजूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील चुरशीच्या लढाईचे लाईव्ह अपडेट :

Domjur Election Result 2021 LIVE: डोमजूर विधानसभा जागेवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, कोण बाजी मारणार?
Domjur Election Result 2021 LIVE
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या जागांवर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे डोमजूर विधानसभा (Domjur Election Result 2021 LIVE). या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसने कल्याण घोष यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपने राजीब बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे 2016 च्या निवडणुकीत राजीब बॅनर्जी यांनी याच मतदारसंघातून बाजी मारली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पक्ष वेगळा होता. आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्सिस्टने यावेळी उत्तम बेरा यांना उमेदवारी दिली आहे. डोमजूर मतदारसंघात यावेळी एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता नेमकं कोण बाजी मारले हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जागा मिळवून कुणाची सत्ता बनणार याची देखील अनेकांना उत्सुकता आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 या मॅजिक आकड्याची गरज लागणार आहे. भाजप खरंच या आकड्याला गवलनी घालून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

डोमजूर मतदारसंघाची 2016 ची लढत

डोमजूर विधानसभा मतदारसंघ (Domjur Election Result 2021 LIVE) हा पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात येतो. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघावर तृणमूल काँग्रेसचा दबदबा आहे. 2016 च्या निवडणुकीत राजीब बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रतिमा दत्ता यांचा 1 लाख 7 हजार 701 मतांनी पराभव केला होता. राजीब यांना 1 लाख 48 जार 768 मतं मिळाली होती. तर प्रतिमा दत्ता यांना 41 हजार 67 मतं मिळाली होती. त्यावेळी भाजप तिसऱ्या नंबरवर होती. भाजपच्या उमेदवाराला 15 हजार पेक्षा जास्त मतं मिळाली होती.

विधानसभा क्षेत्रातील मतदारांची संख्या

2016 च्या निवडणुकीवेळी या मतदारसंघातील मतदारांची संख्या ही 2 लाख 59 हजार 741 इतकी होती. यापैकी 2 लाख 19 हजार 657 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संपूर्ण मतदारसंघात मतदानासाठी एकून 289 बुथ होते. या मतदारसंघात एकूण 84 टक्के मतदान पार पडलं होतं.

डोमजूर विधानसभा मतदारसंघाची सर्वात पहिली निवडणूक ही 1952 साली झाली होती. या निवडणुकीत सीपीआयच्या उमेदवाराचा विजय झाला होता. त्यानंतरच्या निवडणुकींमध्ये या मतदारसंघात सीपीएम आणि काँग्रेसचा दबदबा होता. विशेष म्हणजे सीपीएमच्या उमेदवारांनी या जागेवर एकूण सातवेळा निवडणूक जिंकली आहे. तृणमूल काँग्रेसला 2011 साली पहिल्यांदा या मतदारसंघात यश आलं होतं.

गेल्या निवडणुकीचे आकडे

सध्याचे आमदार : राजीब बॅनर्जी
एकूण मिळालेले मत : 148768
मतदारसंघातील एकूण मतदार : 259741
वोटर टर्नआउट: 84.57 टक्के
एकूण उमेदवार : 8